जागतिक कराटे स्पर्धेत बारामती कराटे क्लबचे खेळाडूची चमकदार कामगिरी

बारामती : गोव्यातील म्हापसा येथे झालेल्या एफ.एस.के.ए. वर्ल्ड कप जागतिक कराटे स्पर्धेत बारामतीतील बारामती कराटे क्लबच्या खेळाडूंनी काता व कुमिते प्रकारात एकूण -१७ पदके जिंकली.सुवर्ण, ६ रौप्य व ३ कांस्य पदके मिळवत दमदार कामगिरी केली. या स्पर्धेत २५०० हून अधिक खेळाडूंनी पुर्तुगल, अमेरिका, जपान, केन्या, थायलंड, श्रीलंका, इराण आदी देशातून खेळाडू सहभागी झाले होते.
क्लबच्या राजन खराडे- २ सुवर्ण, श्रुती भारकड – १ सुवर्ण व १ रौप्य, रेहान भोसले-१ सुवर्ण व १ रौप्य, मंथन भोकरे- १ सुवर्ण व १ रौप्य, या खेळाडूंनी दोन्ही प्रकारात सुवर्ण व रौप्य पदक पटकावून उत्कृष्ट खेळाडूचा मान मिळवला. विजेत्या खेळाडूंमध्ये सुवर्ण पदक विजेते ऐश्वर्या चव्हाण-१ सुवर्ण, रेवा भारकड ,-१ सुवर्ण, आरिषा संचेती -१ सुवर्ण हे आहेत. तक, रौप्यपदक विजेते ओजस उंडे-१ रौप्य, मिननाथ भोकरे-१ रौप्य, ओम दोशी – १ रौप्य,१ कांस्य, कांस्य पदक विजेते बिल्ला शेख १ कांस्य, सुहाना शेख- १ कांस्यपदक पटकावले आहेत. या खेळाडूंना बारामती कराटे क्लबचे अध्यक्ष मिननाथ रमेश भोकरे व महिला कराटे प्रशिक्षिका मिस. शुभांगी भोकरे आदी प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले.