बारामतीत विधानसभा मतदार संघामध्ये 62.31 टक्के मतदान

बारामती : आज झालेल्या बारामती विधानसभा मतदार संघामध्ये सायंकाळी 5 वाजे पर्यंत 62.31 टक्के मतदान झाले, बारामती विधानसभा मतदार संघात एकूण 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगनात उभे होते त्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. बारामतीत कोणाची सत्ता आणि मतदारांनी कोणाला आपला नेता निवडला त्याचा फैसला येत्या 23 नोव्हेंबर रोजी होईलच. दरम्यान नागरिक मतदान करण्यासाठी उशिरा आल्याने अनेक ठिकाणी उशिरा पर्यंत बूथ सुरु होते त्यामुळे अखेरची आकडेवारी प्राप्त झाली नाही.
आज सकाळी तालुक्यातील मौजे काटेवाडी येथे राष्ट्रवादीपक्षाचे उमेदवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सह कुटुंब मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांच्या पत्नी खा. सुनेत्रा पवार, चिरंजीव जय पवार हे देखील सोबत होते. तर राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांचे वडील यांनी काटेवाडी येथे श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, युगेंद्र पवार यांनी मतदान केले तर शहरातील रिमांड होम येथे खा. सुप्रिया सुळे यांनी मतदान केले. तसेच जेष्ठ नेते शरद पवार यांनी माळेगाव येथे मतदान केले.
सकाळ पासूनच मतदान बुथवर मादाराणी मतदान करण्यास सुरुवात केली होती मात्र त्या प्रमाणात मतदार घरातून बाहेर पडला नाही. तर शहरातील बऱ्याच मतदारांचे नाव मतदार यादीतून गायब झाल्याचेही निदर्शनास आले तसेच प्रशासनाने दिलेल्या मतदान चिट्टीवरून मतदान केंद्राचा पत्ता गायब झाला होता. त्यामुळे मतदारांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
तर दिवस भरात शहरातील बालक मंदिर येथे पोलिंग एजंट यांना काही इतर कार्यकर्त्यांनी धमकी दिल्याची माहिती शर्मिला पवार यांनी दिली त्या व्यतिरिक्त कोठेही अनुचित प्रकार झाला नसल्याचे शांततेत मतदान पोलिसांनी सांगितले
मतदानाच्या दिवशी मतदारांना फोनकरून आवाहन
मतदानाच्या दिवशी देखील मतदारांना या पक्षाचे चिन्ह आमके असून त्यावर आपले मतदान करा या आशयाचे फोन येत होते झाला प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला मात्र त्यावर त्यांची कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. येणाऱ्या काळात त्या संदर्भाने प्रशासन काय कारवाई करणार हे स्पष्ट होईलच.
पैशांच्या अपेक्षेने मतदार घरा बाहेर पडेना ?
लोकसभेला पैसे वाटल्याचा अनुभव असल्याने विधानसभा निवडणुकीला देखील पैसे मिळतील या आशेने मतदार पैशांची वाट पाहत होते, मात्र पैसे वाटप झाले नसल्याने शहरातील अनेक भागातील मतदार मतदान करण्यासाठी घराबाहेर पडत नसल्याचे चित्र पाहायला मिळाले तसेच दुपारी एक वाजेपर्यंत साधारण 30 टक्के मतदान झाले होते ते दुपारी 3 ते पाच या वेळेत 62 टाक्यांवर गेले.