मी शरद पवारांना सोडलं नाही….. अजित पवार

बारामती : बारामतीत विधानसभा निवडणुक मतदान प्रक्रिया अवघ्या काही दिवसांवर आली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मी शरद पवारांना सोडले नाही असे विधान केल्याने या वक्तव्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
बारामती विधानसभा मतदार संघात प्रचार दौर्यानिमित्त बारामती तालुक्यातील मौजे माळेगाव येथे मतदार नागरिकांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे विधान केले.
पुढे पवार म्हणाले की, मी शरद पवार यांना सोडायला नको होते असे काहींना वाटतं’, मात्र दरम्यान च्या काळात सर्व आमदार शरद पवारांना सांगत होते सरकारमध्ये जावू. लोकांना वाटत होते की, मी शरद पवार साहेबांना सोडायला नको होते. मात्र मी साहेबांना सोडलं नाही. मी साहेबांना सांगत होतो सर्व आमदारांच्या सह्या होत्या, ते माझ्या एकट्याचे मत नव्हते कारण विरोधी पक्षात असल्यामुळे कामांना स्थगिती आली होती, मी सत्तेत नव्हतो मी विरोधी पक्षात होतो, लोकं मला वेडात काढतील की पैसे पाठवतील आणि स्थगिती देखील देतायत असेही अजित पवार म्हणाले. तर मी अर्थ मंत्री असल्यामुळेच मी बारामतीच्या विकासा कामांसाठी नऊ हजार कोटी रुपये आणू शकलो कारण आधीचे आडीज वर्षे कोरोना काळात वाया गेले होते, पवार साहेब निवृत्त झाले तर मग बारामतीकडे कोण लक्ष देऊ शकतो. असा प्रश्न उपस्तीत करीत, लोकसभेला साहेबांना साथ दिली. साहेबांचा शब्द पाळला, आता विधानसभेला मला साथ द्या, त्यामुळे जेवढे मताधिक्य तुम्ही द्याल तेवढा जास्त निधी विकास कामांसाठी आणण्याची धमक माझ्यामध्ये आहे असेही पवारांनी बोलताना व्यक्त केले.