December 13, 2025

बारामतीत मतदारांना जेवणावळी

hq720

बारामती : बारामतीत कधी नेव्हे तो एकाच कुटुंबाचा घरफोडी सामना रंगल्याने मतदारांना आकर्षित करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून शहरात आणि तालुक्यात चक्क दररोज जेवणावळी उठत आहेत.

बारामतीत सध्या राजकीय आखाडा रंगला असून या ना त्या कारणाने मतदार राजाला जेवणावळीचे आमिष दाखवुन मताचा स्वार्थ साधण्याचा सोईस्कर प्रयत्न राजकीय पक्षाकडून सुरु आहे.

एकूणच या परिस्थितीमुळे एक ना अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आले असून जे अनेक वर्षे बारामतीत घडले नव्हते ते घडताना दिसत आहे मात्र बारामतीचा मतदार शाहणा आणि समझदार असून या मटणाच्या नादाला न लागता योग्य बटन दाबणार अशा देखील चर्चा चौका – चौकात सुरु आहेत. त्यामुळे मतदार राजा जागा हो आणि लोकशाहीचा धागा हो.

error: Content is protected !!