बारामतीत कोयता दाखवुन दहशत माजविण्याचा प्रयत्न
बारामती : बारामतीत पुन्हा कोयता टोळी सक्रीय झालीय की काय ? अशी शंका निर्माण झाली आसुन बारामतीच्या एका युवकाला कोयता दाखवीत दहशत माजविण्याचा प्रयत्न बारामती शहरात झाला आहे.
सविस्तर हाकीकात अशी की, बारामती शहरातील प्रगतीनगर येथे एक युवक आपल्या सहकारी मित्रा सोबत शतपावली करीत असताना पाठीमागून अचानक दोन दुचाकीवरून आलेल्या पाच जणांच्या युवकांच्या टोळक्याने शतपावली करीत असलेल्या युवकाला अडवुन को आहे रे तु, असा का बघतोय असे म्हणत कोयता दाखवीत त्याच्यावर कोयत्याचा वार करून फिर्यादी युवकावर हल्ला करून त्याचा पाठलाग करून दहशत माजविण्याचा प्रकार घडला आहे या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
