लोकसभेला गंमत केली, आता गंमत केली तर जंम्मत होईल ….
बारामती : तुम्ही मतदारांनी लोकसभेला गंमत केली आता विधानसभेला गंमत करू नका, नाहीतर तुमची जंमत होईल असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील पानसरेवाडी येथे बोलताना व्यक्त केले
पुढे बोलताना पवार म्हणाले की लोकसभेला जो आपण निर्णय घेतला त्याबाबत माझं काही एक म्हणणं नाही मात्र आता गंमत केली तर जंमत करेल ठेकेदारांनी खराब काम केली तर दोष मला मिळतोय तर लोकसभेला सुनेत्राला 30 टक्के आणि सुप्रियाला 60 टक्के मते येथून मिळाली यावेळी चांगली मते मिळावी या अपेक्षेने विनंती करण्यासाठी मी आलोय, मी ज्यांना पदे दिली तेच माझ्या विरोधात गेले असे ही व्यक्त केले तर साहेब म्हणाले मी रिटायर्ड होणार आहे त्यामुळे पुढचे कोण बघणार आहे ? असा सवाल उपस्थित करीत हे तुम्हाला माहित आहे, भावनिक होऊ नका, साहेबांचा फक्त फोटो आहे, साहेबांची ही निवडणूक नाही, कधी प्रतिभाकाकी घराबाहेर आल्या का ? काय नातवाचा पुळका आलाय काय.. माहित ? मी काय गंजडा आहे , पिताडा आहे, मी बारामती तालुक्याची वाट लावली का ? मी टीका करायला गेलो तर तो माझा पुतण्या आहे, मी टीका करायला गेलो की घरातल्या घरात कसे काढायचे असाही प्रश्न आहे असे व्यक्त केले.
