पवारांचे घर आणि बारामती फोडण्याचे पाप देवेंद्र फडणवीसांनी केले आहे…खा.सुप्रिया सुळे

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात राष्ट्रवादी फुटण्या मागचे कारण सुप्रिया सुळे आहेत, मात्र पवारांचे घर आणि बारामती फोडण्याचे पाप कोणी केला असेल तर देवा भाऊ तुम्ही आणि तुमच्या पक्षाने केले असल्याचा घणाघाती आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खा सुप्रिया सुळे यांनी केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्व भूमीवर राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गट यांच्यावतीने बारामतीत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी खा. सुप्रिया सुळे बोलत होत्या पुढे बोलताना सुळे म्हणाल्या की, माझ्या बहिणींच्या घरी आयकर विभागाच्या रेडी टाकल्या, पाच-पाच दिवस चौकशी चालू होती, लहान लेकरांनासुद्धा वेळेवर दूध सुद्धा मिळत नव्हते, पाच-पाच दिवस पोलिसांनी माझ्या बहिणींना डांबून ठेवलं होते, काय चूक होती त्यांची असा सवाल उपस्थित करीत कोणी त्यांना चौकशीच्या कारणाने घरात डांबून ठेवले होते त्यांचा काय संबंध होता या राजकारणाशी आज जे बारामतीत चित्र दिसत आहे पवारांची कौटुंबिक लढाई चालू आहे त्याला फक्त आणि फक्त भाजप हेच जबाबदार आहेत असेही सुळे यांनी व्यक्त केले.
तर बाहेरच्यांसोबत लढण सोपं असते मात्र घरच्यांसोबत लढणे फार अवघड असते लोकसभेला फार मोठा संघर्ष केला, तो काळ संघर्षाचा होता मनावर दगड ठेवून जेव्हा निवडणुकीला सामोरे जात होते तेव्हा ती लढाई नको होती मला, कारण घरात लढाई नको, मी राजकारणात कशासाठी आले मी राजकारणात तुमच्या आयुष्यात चांगला बदल घडवण्यासाठी आले आहे. कोणत्याही पदासाठी राजकारणात मी आले नाही असेही खा.सुळे यांनी व्यक्त केले.
मलिदा गॅंग घरी बसावयाची
बारामतीत येणाऱ्या तुतारी वाजणार आहे त्यामुळे जर भविष्यात आमचा विजयी झाल्यानंतर निवडून आल्यानंतर पहिल्यांदा बारामतीतली मलिदा गॅंग घरी बसावयाची कारण जे बारामतीच्या विकासासाठी ते बारामतीसाठीच खर्च झाले पाहिजेत असेही व्यक्त केले.