स्वतःचा जीव धोक्यात घालुन युवकाचे वाचविले प्राण
बारामती : बारामती नगरपालिकेचे सेवा निवृत्त कर्मचारी आणि नगरपालिकेचे आग्निशमन विभागाच्या कर्मचारी यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालुन विहिरीत पडलेल्या युवकाचे प्राण वाचविले.
सविस्तर हाकीकात अशी की, येथील महावितरणाच्या शहर कार्यालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या विहिरीत पुण्याचा युवक समीर शेख ( वय २४ वर्षे ) पडला त्याने मद्य प्राशन केले होते त्यातच साधारण 25 ते 30 फुट खोल विहित त्यामुळे त्याला विहिरीच्या बाहेर येता येत नव्हते मात्र जरी विहिरीत पडला असला तरी तो, विहिरीत सुखरूप जिवंत होता मात्र त्याने मद्य घेतल्याने त्याला बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या अश्या स्थितीत जीवाची पर्वा न करता जीवाची बाजी लावुन नगरपालिकेचे सेवा निवृत्त कर्मचारी मोहन शिंदे , कार्यरत वाहनचालक राजेंद्र मिरगुंडे, फायरमन निखिल कागडा आणि मदतनीस प्रज्वलित अहिवळे यांनी सदरच्या युवकाला विहिरीच्या बाहेर सुखरूप काढून त्या युवकाचे प्राण वाचविले.
