बारामतीत पवारांच्याच घरात पाळणा हलला पाहिजे का ? …महादेव जानकर
बारामती : बारामती आणि इंदापूर करांवर करणी केली आहे, पवारांच्या घरातच पाळणा हल्ला पाहिजे मोठे पवार साहेब म्हणाले 30 वर्षे बारामतीकरांनी माझ्यावर प्रेम केले त्यानंतर 30 वर्षे अजित दादांवर प्रेम केले आता 30 वर्षे युगेंद्र यांच्यावर प्रेम करा पवारांना कुटुंबाशिवाय इतर कोणी दिसत नाही का ? प्रत्येक वेळी पवारांच्याच घरात पाळणा हलला पाहीजे का ? असा सवाल रासपाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी उपस्थित केला.
बारामतीत रासपाचे उमेदवार यांचा प्रचाराचा शुभारंभ कन्हेरी येथे जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला त्यावेळी जानकर बोलत होते. पुढे जानकर म्हणाले की पवार साहेब तुम्ही मोठे नेते आहात तुम्हाला तावरे, जगताप, कोकरे, देवकाते, काळे यांचे नाव का घेता आले नाही ? असा सवाल उपस्थित करीत आपल्याच घरात खासदार आपल्याच घरात आमदार,तुम्हीच विरोधी पक्षाचे नेते आणि आमचे देवकाते, कोकरे फक्त डायरेक्टर, देवकाते आणि कोकरे यांना महादेव जानकर यांच्याशिवाय तुम्हांला कोणी आमदार करणार नाही हे लिहून ठेवा, तुमची मुले पोलिस कर्मचारी आणि यांची मुले पोलिस कमिशनर, तुमची मुले चीटबॉय तर यांची मुले चेअरमन, तुमची मुले सरपंच तर यांची मुले खासदार असे सध्याचे चित्र आहे असेही व्यक्त केले.
तर भाजपची मस्ती वाढली आहे भाजपाने शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत दोन गट केले, आम्ही तुमचे काय वाकडे केले, आमच्याकडे एकच आमदार होता तोपण पळविला त्यामुळे भापाची सत्ता घालविल्या शिवाय महादेव जानकर गप्प बसणार नाही भाजपाचीच मस्ती जिरवितो अशा शब्दात भाजपावर तोशारे ओढले. तर माझा विरोध शरद पवार साहेबांना नाही, माझा विरोध अजित दादांना नाही , माझा विरोध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाही मात्र माझा विरोध बाप खासदार असला तरी मुलगा, मुलगी आमदार, नातुही आमदार आणि पुतण्याही आमदार या घराणे शाहीच्या वृत्तीला माझा विरोध आहे, बारामतीत लोकशाही नाही कारण तुमच्या कित्येक पिढ्या त्यांनाच मतदान करीत आला आहात तर हे नेते कॉंग्रेसमधुन बाहेर पडत्यात आणि भाजपात जातात, भाजपातून बाहेर पडुन कॉंग्रेसमध्ये जातात त्यामुळे एकदा भाजपाला आणि कॉंग्रेसला मुठमाती द्या तर तुमचे चांगले दिवस येतील असेही जानकर यांनी व्यक्त केले.
