February 11, 2026

नागरिकांनो सावधान रहा,  त्या महिलांना माहिती देऊ नका.

WhatsApp Image 2024-11-10 at 11.28.48 AM

प्रतीकात्मक छायाचित्र

बारामती : बारामती आणि परिसरात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून काही महिला सर्व्हे करण्यासाठी दारोदार फिरत आहेत आणि महिलांचे फोटो काढीत आहेत, तुमची गोपनीय माहिती तुमच्या कडून काढून घेत आहेत तेव्हा नागरीकानो सावधान रहा आणि तुमची कोणतीही माहिती त्यांना खातरजमा केल्याशिवार देऊ नका.

राज्यत सध्या निवडणुका सुरु आहेत, त्यामुळे सध्या कोणताही सर्व्हे सुरु नाही अशी माहिती शासकीय स्तारावरून आम्हांला मिळाली आहे त्यामुळे शासकीय योजनेची माहिती घेण्याच्या नावावरून कोणताही अनुचित प्रकार घडु शकतो तेव्हा कोणीही कोणाला कसलीही माहिती देऊ नका तशी माहिती विचारण्यासाठी कोणी आले तर योजनेची बेकायदा माहिती गोळा करीत असल्याने त्या महिलांना सरळ पोलिसांच्या हवाली करा.

सध्या एक ना अनेक प्रकारे नागरिकांची लुट होत असते त्यामुळे अशी खाजगी माहिती घेण्याचा कोणालाही अधिकार नाही तेव्हा जागरूक रहा आणि कोणालाही कसलीही माहिती देऊ नका.

या होत असलेल्या प्रकरणी नागरिक कमालीचे संतप्त झाले असून प्रशासनाने वेळीच त्या सर्व्हे करणाऱ्या महिलांना प्रतिबंध घालावा अन्यथा संतप्त नागरिकांकडून देखील अनुचित प्रकार घडू शकतो.

error: Content is protected !!