October 24, 2025

कुंटणखाण्यातून पाच पिडीत मुलींची सुटका 

sex-racket..

बारामती : अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांनी बुधवार पेठ वेश्या वस्तीत छापा कारवाई करुन  पाच पिडीत मुलींची सुटका करुन चार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

सविसात हाकीकात अशी की, दि सात नोव्हेंबर रोजी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर व फ्रिडम फर्म संस्थेचे एन.जी.ओ. यांना बुधवार पेठ वेश्या वस्तीत कुंटणखाना येथे काही महिलांना
अडकवुन ठेवुन त्यांच्याकडुन वेश्याव्यवसाय करुन घेत असलेबाबत गोपनिय माहिती प्राप्त झाली. सदर ठिकाणी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर कडील अधिकारी अंमलदार व फ्रिडम फर्म संस्थेचे एन.जी.ओ.यांनी प्राप्त बातमीच्या अनुषंगाने दि. सात नोव्हेंबर रोजी बुधवार पेठ वेश्या वस्तीतील कुंटणखान्यातुन छापा करवाई करुन पाच पिडीत मुलीची सुटका करुन कुंटणखाना मालकीणी सह इतर तीन आरोपी असे आरोपी विरुध्द पिटा कलम अन्वये फरासखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास फरासखाना पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी करीत आहेत.

सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा पुणेचे शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे, निखील पिंगळे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली भरोसा सेल, विभागाच्या पोलीस निरीक्षक, संगिता जाधव, सहा.पोलीस फौज.राजेद्र कुमावत, महिला सहा.पोलीस फौजदार छाया जाधव, महिला पोलीस अंमलदार रेश्मा कंक, पोलीस अंमलदार इम्रानखान नदाफ, भुजबळ यांनी केली.

You may have missed

error: Content is protected !!