गोवंश हत्या बंदी कायद्याची बारामतीत ऐशी की तैशी
बारामती : राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असताना देखील गोवंशची बेकायदा कत्तल करण्यासाठी चालवलेल्या 15 वासरांची सुटका पोलिसांनी केली असून याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती येथील इंदापूर रोडवर संघवी पार्क येथील बाजुने गोवंश कत्तलीसाठी एका टेम्पो भरून जाणार असल्याची खबर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ सापळा रचला, सापळा रचल्यानंतर सदर टेम्पो चालकाकडे चौकशी केली असता टेम्पोमध्ये गोवंश जातीची 15 लहान वासरे असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले चालकाकडे कुठलाच पुरावा नसल्याने ही जनावरे कत्तलीसाठी जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर वाहनासह, इसम इरफान दस्तगीर कुरेशी वय 32 ( चलक ) तसेच नाझीम जमीर कुरेशी वय 19 वर्षे दोन्ही रा. कुरेशीनगर, फलटण यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिसांनी दोघांविरोधात बेकायदा गोवंश वाहतूक करणे, निर्दयी व अमानुषपणे, सुरक्षेची व खाद्याची कुठलीच काळजी न घेणे या संदर्भाने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
