बारामतीत सदाभाऊ खोत यांचा निषेध
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्या वतीने महायुती घटक पक्षाचे नेते सदाभाऊ खोत यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने येथील हत्ती चौक येथे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी निषेध केला, यावेळी सदाभाऊ खोत यांचा तीव्र शब्दात निषेध करीत जोरदार निषेध घोषणाबाजी करण्यात आली तसेच खोत यांच्यावर प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वनिता बनकर, आरती शेंडगे, प्रियंका शेंडकर, सुभाष ढोले, जयकुमार काळे यांच्या सह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
