बारामतीतुन 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
बारामती : बारामती विधानसभा मतदारसंघातून 32 उमेदवारांपैकी उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी नऊ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.
बारामती विधानसभा या हाय व्होल्टेज विधानसभा मतदारसंघात प्रथमच पावरा पवार विरोधी पवार काका विरोधी पुतण्या अशी चुरस पाहिला मिळणार आहे निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी बारामती विधानसभा मतदारसंघातून एकूण नऊ उमेदवारांनी आपले नाम निर्देशन पत्र मागे घेतल्याने 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत यामध्ये आठ वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार असून 15 अपक्षांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे बारामती विधानसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे
अजित अनंतराव पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, चंद्रकांत दादू खरात बहुजन समाज पार्टी, युगेंद्र श्रीनिवास पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट, अनुराग आदिनाथ खलाटे भारतीय प्रजा सुराज्य पक्ष, चोपडे संदीप मारुती राष्ट्रीय समाज पक्ष, मंगलदास तुकाराम निकाळजे वंचित बहुजन आघाडी, विनोद शिवाजीराव जगताप संभाजी ब्रिगेड पार्टी, सोयल शहा युनू शहा शेख समता पार्टी, अब्दुलरोफ उर्फ रज्जाक जाफर मुलानी अपक्ष, अभिजीत महादेव कांबळे अपक्ष, डॉ. अभिजीत वामनराव आवाडे बिचुकले अपक्ष, अमोल नारायण चौधरी अपक्ष, अमोल युवराज आगवणे अपक्ष, कल्याणी सुजितकुमार वाघमोडे अपक्ष, कौशल्य संजय भंडलकर अपक्ष, चोपडे सीमा अतुल अपक्ष, मिथुन सोपानराव आटोळे अपक्ष, विक्रम भारत कोकरे अपक्ष, शिवाजी जयसिंग कोकरे अपक्ष, सचिन शंकर आगवणे अपक्ष, सविता जगन्नाथ शिंदे अपक्ष, संतोष पोपटराव कांबळे अपक्ष, संभाजी पांडुरंग होळकर अपक्ष, असे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.
बारामती विधानसभा मतदार संघात एकूण 380587 मतदार आहेत, त्यामध्ये पुरुष 192811 आणि स्त्री 187752 तर 24 तृतीयपंथी मतदार आहेत, तर दिव्यांग व अपंग मतदारांसाठी 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी प्रशासनाच्या वतीने गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात येणार आहे ज्यामध्ये त्या मतदारांच्या सोयीने त्या दिवशी प्रशासनाची टीम मातदानाची सेवा देणार आहे. ज्येष्ठ तसेच गरोदर माता, अपंग मतदार यांच्यासाठी मतदान प्रक्रिया प्राधान्याने घेतली जाणार आहेत तसेच प्रत्येक मतदान केंद्रांवर पाळणाघर असणार तसेच मतदारांसाठी प्राथमिक सुविधा ठेवण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नावडकर यांनी दिली.
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांची उमेदवारी
अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार गटाचे युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पवार विरुध्द पवार या हाय व्होल्टेज लढाईत आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी उडी घेतली आहे. ते बारामतीतून निवडणूक लढवीत आहेत.
