कर नाही त्याला डर कसला……खा. सुप्रिया सुळे

बारामती : दिवंगत आर. आर. पाटलांसारख्या इमानदार आणि कर्तुत्वात माणसाला मानलं पाहिजे. विरोधी पक्षाने एक आरोप केला तेव्हा चौकशी राज्याच्या हिताची झाली पाहिजे. ज्याला कर नाही त्याला डर कसला. अजित पवार यांनी काही केले नसेल विरोधी पक्ष सातत्याने आरोप करत असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या दाबावामुळे आणि त्यांच्या मागणींमुळे कदाचित कर्तुत्वान आणि इमानदार मंत्री म्हणून आर आर पाटलांनी कदाचित ती सही केली असेल, असे मत खा. सुप्रिया सुळे यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना मत व्यक्त केले.
पुढे सुळे म्हणाल्या की, 70 हजार कोटीचा सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला तेव्हा आमचा पक्ष एक होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण लीड केले होते. फडणवीस यांनी अजित पवारांवर 70 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. फडणवीस यांनी चौकशीची मागणी केली होती, मात्र माझं म्हणणं काय आहे त्याच्यात काही तथ्यच नव्हतं. काय झालं याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांना द्यावा लागेल, कारण पहिला आरोप त्यांनी केला होता. आरोप आधी झाला की फाईलवर सही आधी झाली. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना फाईल दाखवली तेव्हा अजित पवार विरोधी पक्षात होते, देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री होते. जेव्हा तुम्ही शपथ घेता तेव्हाफाईल एकमेकांना दाखवायची ही मुभा कोणालाच नसल्याचे व्यक्त करीत खा सुळे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.
देवेंद्र फडणवीस यांना उत्तर द्यावा लागेल. तुम्ही मुख्यमंत्री असताना अजित पवारांना फाईल दाखवली कशी? ते तर तुमच्या विरोधात होते ना ? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अशा फाईल लोकांना दाखवत असतील तर हे चिंताजनक नाही का? हा विश्वासघात नाही का ? या सर्वांचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांना द्यावे लागेल, असे खा सुळे बोलताना म्हणाल्या.