घर फोडायचे पाप मला माझ्या आई वडिलांनी कधी शिकविले नाही….शरद पवारांचा अजित पवारांवर हल्ला बोल.

बारामती : तुम्हांला स्वातंत्र्य दिले अधिकार दिले तुमच्या ताब्यात इथल्या संस्था दिल्या, मी कधी तुमच्या निर्णयात हस्तक्षेप देखील केला नाही एवढे सगळे देऊन आणि अशी स्थिती असताना ही वेळ का यावी असा सवाल उपस्थित केला. घर फोडायचे पाप मला माझ्या आई वडिलांनी माझ्या भावंडांनी कधी शिकविले नाही. माझे भाऊ माझ्यावर प्रचंड प्रेम करणारी होती. सहा महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक होती तेव्हा नेते सांगत होते साहेब येतील भावनिक करतील डोळ्यात पाणी आणतील तुम्ही भावनीक होऊ नका, मात्र माझ्या डोळ्यातून टिपका वाहतोय का ? मात्र कालच्या सभेत कोण ? ( स्वतः रुमालाने डोळे पुसत अजित पवारांची मिमिक्री शरद पवारांनी केली ) असा सावल उपस्थित केला. आणि उपस्थितांचा एकच जल्लोष झाला, तर हा प्रश्न भावनेचा नसुन तत्वाचा आहे गेले चार महिन्यांपासून राज्यात फिरतोय त्याचे कारण राज्यातली सत्ता बदलायची आहे. असे मत जेष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.
बारामती येथील कन्हेरी येथे राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाचे विधानसभेचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला त्या कार्यक्रमात जेष्ठ नेते खा. शरद पवार बोलत होते यावेळी खा. सुप्रिया सुळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी साखर संकुलाचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, युगेंद्र पवार, माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, तालुकाध्यक्ष एस.एन.जगताप, युवक अध्यक्ष सत्यव्रत काळे, महिला युवतीअध्यक्षा आरती शेंडगे तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
पुढे शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रात आम्ही राष्ट्रवादी पक्ष सुरू केला, अनेक वर्ष लोक निवडून गेले, राज्य सुधारलं मात्र हे सर्व होत असताना आता प्रश्न निर्माण झालाय हा पक्ष कोणी सुरू केला ? पक्ष काढला मी.. चिन्ह ठरवले मी, आणि एक दिवशी काही लोकांनी आमच्यावर खटला चालवला, की पक्षाचे मालक ते आहेत आम्ही नाही, चिन्ह त्यांचे नाही, आमचे आहे त्याचा खटला सुरू झाला आणि समन्स जर कोणाला निघाला असेल तर ते शरद गोविंदराव पवार यांना निघाले की कोर्टात तुम्ही हजर राहा निवडणूक आयोगाचा हा समन्स होता, यापूर्वी समन्स कधी पाहिला नव्हता, समन्स म्हणजे हजर राहणे बंधनकारक आहे. मीही गेलो कोर्टात हजर राहिलो प्रत्यक्षात केस मी करायला पाहिजे होती पण केस त्यांनी केली, समन्स मला पाठवला आणि राज्याची केंद्राची सत्ता त्यांच्या हातात असल्यामुळे पक्ष आणि चिन्ह त्यांना दिलं. त्यामुळे आपल्याला नवीन चिन्ह घ्यावं लागलं, यापूर्वी आम्ही तुम्हाला लोकांना आवाहन करायचो आणि तुम्ही सत्ता आणि राज्य आमच्या हातात द्यायचा त्यावेळी चार वेळा उपमुख्यमंत्री बारामतीचा होता. मात्र पाचव्यांदा उपमुख्यमंत्री व्हायला भाजपाची मदत घेतली त्याला काहीच कारण नव्हतं, जेव्हा निवडणूक झाली तेव्हा भाजपवाल्यांनी त्यांना मत दिले नव्हते मत तुम्ही दिली होती, राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार म्हणून मते तुम्हाला दिली होती असे असताना भाजपच्या मदतीने कशाला पद घ्यायचे असा सवाल अजित पवारांना जेष्ठ नेते शरद पवारांनी उपस्थित केला. लोकशाहीत पदही लोकसेवा करण्यासाठी असतात. आज बारामतीचा विकास सांगितला जातोय मात्र त्या विकासात सगळ्यांचा हातभार आहे, सगळ्यांच्या प्रयत्नाने विकास होत असतो चांगलं करणाऱ्याला चांगलं म्हणायचं हा माझा स्वभाव आहे, आम्ही वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्या मी मंत्री होतो म्हणूनच ते शक्य झालं तसेच बारामतीत एमआयडीसी आणत असताना तेथे शेतीपूरक उद्योगाशी निगडित कारखाने आणण्याचा प्रयत्न केला त्याच धर्तीवर डायनॅमिक्स डेअरी आणली आम्ही इथं कारखाने आणत होतो, दारूचे कारखाने आणीत नव्हतो असा चिमटा देखील अजित पवारांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काढला.
आम्ही नेहमी सांगत आलोय शेतीला जोडधंदा गरजेचा आहे त्यामुळे एकाने नोकरी केली तर दुसऱ्याने शेती करावे आम्ही सत्तेचा वापर लोकहितासाठी वापरला मात्र आजकाल बारामतीत मलिदा गॅंग हा शब्द सारखा ऐकायला यायला लागलाय तो प्रकार काय असतो असला प्रकार आम्ही केला नाही असा देखील टर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवारांची उडविली. सत्ता नसताना आपल्या सहकाऱ्यांची साथ सोडायची नसते मात्र आमच्या काही सहकाऱ्यांनी सत्ता नसताना पहाटे शपथविधी घेतला राज्यपालांना पहाटे साडेपाच वाजता उठून शपथ घेतली आमचा विचार सोडला आणि शपथ घेतली अशीही खंत व्यक्त केली.
मी केंद्रात त्यांनी राज्यात संघटना पाहिची होती. मी त्यांच्याकडे पक्ष दिला, नव नेतृत्व आहे या दृष्टीने पाहिलं पण त्यांनी त्याच पक्षाचे दोन तुकडे केले, आणि भाजपाकडे जाऊन मिळाले. पद मिळवलं पण त्याच्या आधी चार वेळा ते पद मिळालं होतं ना ? असा सवाल उपस्थित करीत जर का तुम्हाला चार वेळा पद मिळालं एखादा वेळी नाही मिळालं तर काय घर मोडायचं असतं का ? असं देखील सवाल उपस्थित केला. आता ते सांगता येत घर मी फोडलं, घर फोडायचं काय कारणच नाही कारण घराचा आणि पवार कुटुंबाचा वडीलधारी मीच आहे. आणि आज अखेर सगळे माझं ऐकत होते कुटुंब एक कसे राहील याची काळजी मी घेत राहील, तो माझा स्वभाव आहे. माझ्या कडे राज्याची सत्ता होती, अनेक पदे देण्याच्या मला अधिकार होता, मी अनेकांना मंत्री केलं, तसेच तुम्हाला अनेक पद दिली, उपमुख्यमंत्री केलं त्यातलं एकही पद सुप्रियाला दिलं नाही, स्वतःच्या मुलीला मी कधी पद दिले नाही, तुम्हाला अनेक पदे दिली आणि सुप्रिया ने देखील कधी पद मागितली नाहीत मात्र हे सगळं करीत असताना घर एकत्र ठेवलं पाहिजे याच्या पलीकडे दुसरा कोणताही विचार माझ्या मनात आलेला नाही. अश्या शब्दात अजित पवारांचा शरद पवार यांनी समाचार घेतला.