साहेबांनी आमच्या तात्यासाहेबांच घर फोडले नाही का ? भर सभेत अजित पवारांना अश्रू अनावर…
बारामती : मागे माझी चूक झाली होती. ती झालेली चूक मी कबूलही केली, मात्र आता कोणी चूक केली ?. असा सवाल उपस्थित करीत, पहिल्यांदा फॉर्म मी भरणार होतो. मग ! आम्ही तात्या साहेबांचे कुटुंब, बिकट परिस्थितीतुन आम्ही परिस्थिती चांगली केली. खुद्द आईने सांगितले होते, माझ्या दादाच्या विरोधात फॉर्म भरू नका. मग फॉर्म कोणी भरायला सांगितला ?, असे विचारले तर साहेबांनी फॉर्म भरायला लावला, म्हणजे साहेबांनी तात्या साहेबांचे कुटुंब फोडले नाही का? असा सवाल काका व जेष्ठ नेते शरद पवार यांना उद्देशुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला. त्यावेळी भर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अश्रू अनावर झाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत भव्य शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारीचा अर्ज भरला आणि त्यानंतर परंपरेप्रमाणे कन्हेरी येथे प्रचाराचा नारळ वाढवण्याच्या वेळी सभेचे आयोजन केले होते त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
पुढे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ‘मी सुप्रियाच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होते, जी चूक मी केली होती ती मान्य करतो , पण आता चूक कोणी केली ?, फॉर्म कोणी भरायला सांगितला तर साहेबांनी फॉर्म भरायला सांगितला, म्हणजे साहेबांनी आमचं तात्यासाहेबांचं घर फोडलं नाही का ? असा सवाल करताच अजित पवार यांना सभेच्या स्टेजवर अश्रू अनावर झाले. दरम्यान स्टेजवर अजितपवारांना यांना अश्रू अनावर झाल्याच दिसताच सभेला उपस्थित आलेल्या महिला देखील भावुक झाल्याचे निदर्शनास आले. तर दादा आता रडायचं नाही तर लढायचं अशी जोरदार घोषणाबाजी सभेला उपस्थित असलेल्या महिलांनी आणि कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.
तर बारामतीचा विकास करीत असताना आपल्या परिसरातल्या लोकांना कामे दिली, तर, उगीच मलिदा गॅंग वगैरे बिरूद लावले जात आहेत, यावर पवार म्हाणाले की ते काम जरी स्थानिकाला दिले तरी त्यावर माझा कटाक्ष असतो आणि ती दर्जेदार करण्यावर माझा भर असतो असेही पवारांनी सांगितले, तर माणूस आहे चुका करतो आणि स्वीकारही करतो. तुम्ही मला मोठ केले वरच्या पदावर नेल. टॉपच्या नेत्याच्या ओळखी झाल्या, ते काय करतात ते प्रशासन कसे राबवतात हे मला पाहाता आले, मी जनतेला काय देता येईल याचा विचार करतो. मला यावेळी निवडणुकीला उभे राहिचे नव्हते, ती नौटंकी वगैरे काही नव्हती पण कार्यकर्त्यांनी आग्रही भूमिका घेतल्याने मी विचार बदलला, असेही अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यकर्ते यांना सबुरीचा सल्ला
हा अजित पवार पूर्वीचा नाही लोकसभे नंतर बदलला आहे, त्यामुळे आता मी सबुरीने घेतो तुम्ही देखील सबुरीने घ्या टोकाचा निर्णय घेऊ नका कोणाचा अपमान होईल असे वागु नका असा सबुरीचा सल्ला अजित पवार यांनी उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना दिला.
