प्रसार भारती, विकास यात्रा अंतर्गत आकाशवाणी पुणे आयोजित परिसंवाद संपन्न

बारामती : प्रसार भारती, भारत सरकार यांच्या विकास यात्रा अंतर्गत आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीने आणि ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे शारदाबाई पवार महिला महाविद्यालय, बारामती, आयोजित “शेतीतले विविध घटक आणि आरोग्य” या विषयावर परिसंवाद नुकताच संपन्न झाला.
हा उपक्रम आकाशवाणी / दूरदर्शन केंद्र, कार्यक्रम प्रमुख, इंद्रजित बागल, संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार, विस्वस्त सुनंदा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्राचार्य निलेश नलावडे, समन्वयक प्रसाद तनपुरे व मानव संसाधन प्रमुख गार्गी दत्ता यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. परिसंवादाच्या उदघाटन कार्यक्रमात पुणे आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी विनायक मोरे यांनी विकास यात्रा व परिसंवादाच्या आयोजनाचा हेतू व विषयाचे महत्त्व सांगितले तसेच प्राचार्य श्रीकुमार महामुनी यांचा आकाशवाणी पुणेच्या वतीने स्मृती चिन्ह देवून सन्मान केला.
यावेळी उदघाटनाच्या सत्रात प्राचार्य डॉ. महामुनी यांनी शेती आणि माती, पाणी, हवा यांच्या अनन्यसाधारण महत्वाबद्दल सांगून मातीची निर्मिती प्रक्रिया त्यांमधील सूक्ष्म जीव आणि ते बजावत असलेली भूमिका व त्यांचा शेतीसाठी होत असलेला फायदा याची माहिती देवून आकाशवाणीने या घेतलेल्या अत्यंत महत्वाच्या विषयावरील परीसंवादाच्या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी विनायक मोरे, अभियंता, प्रसाद कराडकर, तंत्रज्ञ संतोष ठाकरे व चंद्रकांत वाकडे यांचा प्राचार्य प्रो.डॉ. श्रीकुमार महामुनी यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.
या परिसंवादात डॉ. नामदेव फटांगरे, व्हीआयटी पुणे यांनी ‘शेतीतील औषधी घटक’ यांवर संवाद साधताना शेती संदर्भातील औषधी घटक, औषधी वनस्पती व आरोग्य याबद्दल माहिती देवून परिसरातील वनस्पतीचे महत्व चौथ्या सत्रात सांगितले. तिसऱ्या सत्रात तज्ञ मार्गदर्शक डॉ. किरण रणदिवे, पुणे यांनी आपल्या भाषणातून ‘बुरशी आणि शेती परस्परसंबंध’ याबद्दल माहिती देताना बुरशी, उपयोग, गरज, संवर्धन आणि संशोधन याबद्दल माहिती देवून बुरशीचे अनेक पैलू सांगताना यातील उद्योग व संशोधनाच्या अनेक संधी सांगून आरोग्य क्षेत्रातील महत्व सांगितले. दुसऱ्या सत्रात ‘कृषी रसायने, खते आणि आरोग्य’ यावर संवाद साधताना संतोष गोडसे, विषय विशेषज्ञ,
केव्हीके बारामती यांनी माती सुधार, पीक उत्पन्न वाढ, चारा उत्पन्न वाढ, दूध उत्पन्न वाढ इत्यादी साठी वापरली जाणारी रसायने आणि त्यांचा मानवी अन्न साखळीतील प्रचंड प्रमाणातील शिरकाव आणि त्यांचा आरोग्यावर होणारा परिणाम याबद्दल माहिती देवून आधुनिक शेतीतील AI चा वापर करून संस्थेत होत असलेल्या प्रयोगांची माहिती दिली.
पहिल्या सत्रात प्रा. रा. बा. देशमुख, यांनी ‘मृदा – आणि शेतीविषयक विविध घटक ‘ यावर संवाद साधला यावेळी त्यांनी मृदा, प्रकार, घटक, वनस्पती, प्राणी, शेती, पर्यावरण यांच्या परस्पर संबंधातील अत्यंत महत्वाचं दुवा म्हणजे जमिनीतील सूक्ष्म जीव आणि त्यांचे महत्व, त्यांचे माती – पाणी – हवा – वनस्पती – प्राणी यांच्यातील अस्तित्व त्यांचे महत्त्व, ताकद व गरज यावर माहिती दिली.
या परिसंवादासाठी महाविद्यालयातील 260 विद्यार्थिनी व 12 प्राध्यापक उपस्थित होते. विद्यार्थिनी प्रतीक्षा केसकर, प्रेरणा रणवरे, जान्हवी बागडे, चैताली कोतवाल व प्रा. आरती वाघ यांचा कार्यक्रम अधिकारी विनायक मोरे यांचे हस्ते प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. या संपूर्ण परिसंवादाचे संचलन प्रा. डॉ. आश्लेषा मुंगी यांनी तर रा. बा. देशमुख यांनी समन्वयन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी होण्यासाठी कला व वाणिज्य शाखा प्रमुख डॉ. मोहन निंबाळकर, विज्ञान व गृहविज्ञान शाखा प्रमुख डॉ. परिमिता जाधव, अटल इंक्यूबेशन सेंटरच्या संचालक डॉ जया तिवारी, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. आश्लेषा मुंगी, सल्लाउद्दीन इनामदार, सुहास गवारे, किरण चव्हाण, अविनाश डावखर, आनंदा कांबळे, राजेंद्र जाधव, रवींद्र रंधवे, दत्तात्रय खराडे, गायत्री साळुंखे, अनिल पानसरे व अमोल गव्हाणे यांचे सक्रिय सहकार्य व परिश्रम लाभले.