बारामतीच्या आंबट सर्कल भाऊसाहेबांनां नागरिकांनी चोपले…… बारामतीत चर्चेला उधाण

बारामती : बारामतीच्या एका सर्कल भाऊसाहेब यांनी आपल्या कनिष्ट महिला तलाठी कर्मचारी यांच्या विषयी वाईट उद्देशाने ठेवून, त्या महिलेच्या घरी जाऊन तिच्याशी लगड करण्याचा प्रयत्न केला, होत असलेला प्रकार स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्याने सदरच्या सर्कल भाऊसाहेबाला स्थानिक नागरिकांनी चांगलाच चोप दिल्याची घटना घडली आहे.
बारामती कार्यरत एका सर्कलने त्याच्या अखत्यारीत असलेल्या महिला तलाठी कर्मचारी यांच्यावर वाईट उद्देशाने पाळत ठेवत असे, त्याच उद्देशाने सदरच्या सर्कलने बदली झालेल्या सदर महिलेच्या घरी जाऊन वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न केला, त्यात महिलेने बाचावात्मक भूमिका घेतल्याने वेळीच स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करीत, त्या आंबट सर्कलला चांगलात सामुहिक चोप दिल्याची घटना घडली आहे. सध्या झालेल्या प्रकारानंतर सदरचा सर्कल काही दिवसांच्या रजेवर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे झाल्या प्रकारची शहरात जोरदार चर्चा असून एका बड्या अधिकारी यांनी मध्यस्थी करीत सध्या प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे.
बारामती महसूल कार्यालयात सध्या एकाच जिल्ह्यातील अनेक कर्मचारी यांची सांख्य जास्त झाली असून तोचतो एकच कर्मचारी एकाच ठिकाणी एकाच टेबलावर अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. तर एकाच इमारतीत दुसऱ्या ठिकाणी कार्यरत कर्मचारी इतरांच्या कामात हस्तक्षेप करीत अनेक कर्मचारी यांची सध्या मनमानी सुरु आहे त्याला वेळीच पायबंद घातला पाहिजे.