तर माझी सटकते….उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शाब्दिक फटकारले.

बारामती : बारामती आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या काही प्रश्नांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चक्क पत्रकारांचे कान टोचले मी तुम्हांला उत्तरे देईन मात्र तुम्ही माझ्या योग्यतेचे प्रश्न विचारावेत तुम्ही काहीही विचारात राहिला तर माझी सटकते असा सबुरीचा साला देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांचे कान टोचले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत घडलेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली होती त्या अनुषंगाने आणि राज्यातल्या घडामोडींच्या अनुषंगाने पत्रकार प्रश्न विचारतील असा त्यांना अंदाज होता मात्र अपेक्षित प्रश्न न विचारता पत्रकार वेगळेच प्रश्न विचारू लागले त्यावर पवार म्हणाले तुमच्या सिनियर पत्रकारांनी नव्या पत्रकारांना प्रश्न कसे विचारावेत हे शिकविले पाहिजे तुम्हीं विचारताय मी सांगतोय म्हणुन तुम्ही काहीही विचारणार का ? अशा शब्दात पत्रकारांना प्रेमाने शाब्दिक फटकारले.
तर बारामतीमधील एका घरकुल योजनेचे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी लोकार्पण झाले मात्र अद्याप लाभार्थ्यांना ताबा दिला नाही त्यावरून खा. सुळे नाराजी व्यक्त केल्याचा प्रश्न विचारला होता त्यावर पवार संयम ठेवत तुम्ही काहीही विचारता तेथे लाभार्थ्याच्या हिस्सा त्याचा प्रश्न आहे, त्याचाही प्रश्न सुटला आहे, मला वाटलं म्हणून मी उद्घाटन केले असे उत्तर देत, तुम्ही बारामती आणि इतर तालुके बघा त्याचा विचार करा मग मला प्रश्न विचारा, तुम्ही काहीही विचारल्यावर माझी सटकते आहे असेही सांगायला विसरले नाहीत. जागा वाटपाच्या प्रश्नावर जे मी जाहीर केले तेच तुम्ही मला विचारात आहात अश्या इतरही प्रश्नांवरून उपमुख्यमंत्री यांनी नाराजी व्यक्त केली.
तेव्हा मित्रांनो तुम्ही प्रश्न विचारा तो तुमचा हक्क आहे, मात्र पेशाची प्रतिष्टा पणाला लागेल असे करू नका असा सबुरीचा सल्ला आम्ही या पोर्टलच्या माध्यमातून आम्ही देत आहोत.