बारामतीत भंगार व्यवसायिकाचे अपहरण करणारी टोळी जेरबंद.

बारामती : पोलीस असल्याची बतावणी करत एका भंगार व्यवसायिकाचे अपहरण करून त्याला लुटणाऱ्या टोळीतील सहा जणांपैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. बारामती तालुका पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्त पणे ही कारवाई केली आहे या कारवाईत दोन गावठी पिस्तुलासह दोन लाख 51 हजारचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
या प्रकरणी संतोष लक्ष्मण भंडलकर ( वय 42 रा. पणदरे. ता. बारामती ) सुरेश अशोक राखपसरे ( वय 33 रा. कुंजीर वस्ती मांजरी तालुका हवेली ) शेखर सुभाष शिंदे ( वय 32 रा. सांगवी ता बारामती ) सुरज शंकर मदने रा. माळेगाव ता. बारामती मूळ रा. पणदरे बारामती ) हरिभाऊ बबन खुडे व अशोक गणपत बनसोडे ( दोघे रा. कुंजीर वस्ती मांजरी ता. हवेली ) यांनी सांगण मताने गुन्हा केला आहे.
यामध्ये अटक केलेला सुरज मध्ये हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सातारा लोणंद वाठार मोहीम फलटण सातारा शहर आणि ग्रामीण मध्ये तसेच यवत बारामती तालुका बारामती शहर पोलीस ठाण्यात एकूण 15 गुन्हे दाखल आहेत तो ट्रॅक्टर चोरीतील मास्टर असून इतर आरोपींवरही प्रत्येकी दोन-तीन गुन्हे दाखल आहेत हे सर्व पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी आहेत बारामती तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपहरण मारामारीसह शस्त्र अधिनियमानुसार अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पुण्यातील फिर्यादी कुतुबुद्दीन सुभेदार शहा वय 40 वर्ष राहणार तांदुवाडीत बारामती यांचे वंजारवाडीतील भंगार खरेदी विक्रीचे दुकान आहे तेथे दिनांक 23 सप्टेंबर रोजी त्यांचे अपहरण करण्यात आले होते ते दुकानावर असताना चांद अनोळखी व्यक्तींनी येऊन पांढऱ्या रंगाची आय ट्वेन्टी कार विक्रीसाठी घेऊन आले असल्याचे बतावणी केली तर त्यानंतर त्यांना त्या कारमध्ये बसवले त्यांच्या जवळील मोबाईल व आठ हजार रुपयांचा मुद्देमाल काढून घेतली तू चोरीचा माल खरेदी केला आहे पंधरा लाख रुपये दे नाहीतर तुला भिगवण पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ असे सांगितले फिर्यादीने आरडाओरडा केल्यानंतर एकाने पिस्तूल असा धाक दाखवला त्याला दौंड नगर रोड ने चिखली गावाजवळील एका पेट्रोल पंपावर सोडून देण्यात आले. या गुन्ह्याचा तपास करीत करण्यासाठी करीत असताना बातमीदाराच्या मदतीने संबंधित कार संतोष भंडलकर वापरत असल्याचे समजले त्यानुसार हिंगणगाव येथे संतोषला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून अन्य आरोपींची नावे निष्पन्न झाल्यानंतर गुन्ह्यात वापरलेली सदरची कार पोलिसांनी ताब्यात घेतली तसेच गुन्ह्यात वापरलेले दोन पिस्तुले ही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळीकर तालुका पोलीस ठाणे निरीक्षक वैशाली पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप सकपाळ, दत्ताजी मोहिते, राहुल गावडे, बाळासाहेब कारंडे, अभिजीत एकशिंगे, स्वप्नील आहिवळे, विनोद पवार, अजय घुले, राजू मोमीन, अतुल देवरे, निलेश शिंदे, अभिजीत भुजबळ, विजय कांचन, नीरज जाधव, तुषार भोईटे, सागर नामदास, राम कदम, उपनिरीक्षक युवराज पाटील यांनी केली.