माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत गोंधळ.

बारामती : पवारांची एक हाती सत्ता असलेला साखर कारखाना म्हणून ओळख असलेल्या साखर कारखान्याच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत सभासदांचा राडा पाहायला मिळाला या मुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची 69 वी सर्वसाधारण वार्षिक सभा सुरू असताना चेअरमन केशव जगताप यांनी सांगितले की जेष्ठ नेते शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने माळेगाव कारखान्याच्या शिवनगर प्रसारक मंडळासाठी तीन कोटी रुपयाचा चेक विकासासाठी आणि गोरगरीब विद्यार्थ्यांच्या अडीअडचणीसाठी दिला आहे याबद्दल पवार कुटुंबीयांचा चेअरमन यांनी अभिनंदन करत प्रस्ताव मांडला या प्रस्तावाला भाजपचे सोपानराव देवकाते यांनी आक्षेप नोंदवत प्रश्न उपस्थित केला. आणि चेअरमन तुम्ही पवार कुटुंबियांच्या उदोउदो करत अभिनंदन केले पण आपल्या कारखान्याला हजार कोटी रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री, सहकार मंत्री अमित शहा यांनी कारखान्यासाठी अनुदान दिले त्याबद्दल अभिनंदन करत प्रस्ताव मांडला नाही आम्हाला तुमचा खेद वाटतो.. त्यावर पवार गटातील कार्यकर्ते सभासद यांनी गोंधळ सुरू केला यावर आक्षेप घेतलेल्या सोपानराव देवकाते यांनी सभासद माकडांनो गप्प बसा असं म्हटलं यावर कारखान्याचे चेअरमन केशव जगताप यांनी तुम्ही सभासदांना माकड म्हणू नका असे म्हणाले यानंतर खाली बसलेल्या सभासदानी मोठा गोंधळ सुरू केला.. गोंधळ थांबवण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.