बारामतीतील महाविद्यालयात विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या

बारामती : बारामती शहरातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या आवारामध्ये एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलाला धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
घटनेनंतर बारामती परिसरात त्या मुलाविषयी हळहळ व्यक्त केली जात आहे महाविद्यालयाच्या आवारात सकाळी 10:30 च्या सुमारास पूर्ववैमनस्यातून तसेच गाडीला कट मारण्याच्या कारणावरून अल्पवयीन मुलांमध्ये बाचाबाची झाली त्याचे रूपांतर मारामारीत झाले आणि त्यात धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला त्यामध्ये एका अल्पवयीन विद्यार्थ्यांवर कोयत्याने वार केल्याची माहिती मिळत मिळाली ज्याच्यावर गंभीर वार झाले आहेत तो विद्यार्थी तो घटनास्थळीच मृत झाला, दरम्यान त्याला तातडीने सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. घटनेनंतर महाविद्यालयाच्या आवारात पोलीस तातडीने पोहोचले दरम्यान पोलिसांनी हल्ला करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि त्याच्यासोबत असलेला आणखी एक मुलगा फरार झाले आहे यामध्ये जो मुलगा मृत झाला तो आणि त्याच्यावर ज्यांनी हल्ला केला ते अशी सर्व मुले अल्पावईन आहेत
पुण्या पाठोपाठ बारामतीला शिक्षणाचे माहेरघर समजलं जातं. तर शांतता प्रिय शहर म्हणून बारामती शहराची ओळख आहे. मात्र बारामती शहरातील एका नामांकित महाविद्यालयात बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा महाविद्यालयाच्या मुख्य आवारातच धारदार कोयत्याने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने बारामती शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली असून चिंता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणावर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली की, सकाळी साडे अकराच्या सुमारास महाविद्यालयाच्या परिसरात बारावीत शिकणाऱ्या तीन विधी संघर्षित बालकांपैकी एकाचा अन्य दोघांनी मिळून शस्त्राचा वापर करून हल्ला केला. व या हल्ल्यात दुर्दैवाने एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणातील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दुसऱ्याचा पोलिस शोध घेत आहेत. एका महिन्यापूर्वी गाडीचा कट मारण्यावरून दोघांच्यात वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून निर्घृण हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
महाविद्यालयात सुरक्षा यंत्रांना, सीसीटीव्ही कॅमेरेची व्यवस्था आहे असे असतानाही दप्तरात शस्त्र लपवून हल्ला केला आहे.
सदर गुन्हयातील विधी संघर्षित दोन विद्यार्थी नशा करत असल्याची चर्चा आहे. यावर पोलीस अधीक्षक म्हणाले की, अशा प्रकारची कोणतीही माहिती अद्याप पुढे आलेली नाही.