December 9, 2025

आरोपीला फाशी दिली असती तर मुख्यमंत्र्यांना पहिला पेढा मी दिला असता.. खासदार सुळे

IMG_20240924_183845

बारामती : बदलापुर गुन्ह्यात तपास हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवुन त्या नराधमाला भर चौकात फाशी द्यायला हवी होती, ज्यामुळे समाजात एक योग्य संदेश गेला असता, आरोपीला फाशीची शिक्षा दिली असती तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पहिला पेढा मी दिला असता,  मात्र झालेल्या एन्काऊंटरने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत,  तर जो पोलिसांच्या ताब्यात आहे त्याच्या हातात बंदूक आलीच कशी ?  त्यामुळे एकूणच पोलिस प्रशासनाची देखील सुरक्षा धोक्यात आहे असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना राज्य सरकार समोर प्रश्न उपस्थित केला.

पुढे बोलताना सुळे म्हणाले की, यापूर्वी महाराष्ट्रात एन्काऊंटर हा शब्द कधी ऐकला नव्हता हा नेमका एन्काऊंटर कसा याचे उत्तर राज्य सरकारने द्यावे, तर बदलापूर प्रकरणातील आरोपीचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमात वायरल होत आहे त्यामध्ये त्याचे दोन्ही हात बांधलेले दिसतात तसेच त्याच्या चेहऱ्यावर काळे कापड देखील बांधले आहे असे असताना आरोपीने पोलीसाची बंदूक कशी हिसकावली असा देखील सवाल उपस्थित केला या प्रकरणात जर पोलीस प्रशासनाने वेळीच एफ आय आर दाखल झाली नाही ती का झाली नाही ? असा सवाल उपस्थित करीत या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी असेही व्यक्त केले.

फडणवीस जेव्हा गृहमंत्री होतात तेव्हा गुन्हेगारी वाढते

जेव्हा जेव्हा देवेंद्र फडवणीस गृहमंत्री होतात तेव्हा तेव्हा महाराष्ट्रातील गुन्हेगारी मध्ये वाढ होते हे मी सांगत नाही तर हा मीडिया आणि शासकीय रिपोर्ट आहे फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा दिली असती तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पहिला पेढा मी दिला असता असेही सुळे यांनी व्यक्त केले

 राज्यातले हे सरकार पॅनिक मोडवर आहे वेगवेगळे झटपट निर्णय घेऊन आम्ही कसे गतिमान आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत त्यांना सांगण्यासारखे काहीच नाही रोज नवीन निर्णय घेत आहेत मात्र ठोस कामे नाहीत अशा शब्दात सरकारवर निशाणा साधत, धनगर, मराठा, लिंगायत, मुस्लिम या समाजाची या सरकारने फसवणूक केली आहे दहा वर्षांपूर्वी बारामतीच्या शारदा प्रांगणात फडवणीस यांनी धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते ते देखील आज अखेर पूर्ण झालेले नाही.

उद्घाटनानंतर लाभार्थ्यांना अद्याप ताबा नाही…

बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीतील लाभार्थ्यांना वसाहतीचे उद्घाटन होऊन देखील अद्याप घराचा ताबा दिल्या नाही याबाबत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करीत असल्याचे खासदार सुळे यांनी सांगितले

तीनहत्ती चौक आणि शहरातील वाहतूक कोंडीवर लवकरच तोडगा. 

दरम्यान खासदार सुळे यांनी नगरपालिकेत जाऊन मुख्य अधिकारी महेश रोकडे यांची भेट घेतली तर शहरातील तीनहत्ती चौक, भिगवण चौक आणि वाहतुकीची समस्या याबाबत चर्चा केली तर याबाबत रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची मदत घेतली असून त्यावर सेव्ह लाईफ नावाची एक स्वयंसेवी संस्था आहे ती संस्था चार आठवड्यात लवकरच उपायोजना सुचवणार आहेत असे देखील सुळे यांनी सांगितले

error: Content is protected !!