शारदाबाई पवार महिला महाविद्यालयात ग्राहक संरक्षण व हक्कांबाबत जनजागृती
माळेगांव : शारदाबाई पवार महिला महाविद्यालय शारदानगर येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींना ग्राहक संरक्षण कायदा व नवीन सुधारित कायदा आणि ग्राहकांचे हक्क याबाबतचे मार्गदर्शन ग्राहक संरक्षण परिषद पुणे जिल्हा सदस्य व अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष, कायदेतज्ज्ञ तुषार झेंडे यांनी केले.
याबाबतची अधिकची माहिती देताना रोजच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कोणत्या ना कोणत्या कारणांनी ग्राहकच असते, त्यामुळे त्याला त्याचे हक्क व अधिकारांची माहिती असणे गरजेचे आहे.
अन्न प्रशासन विभाग त्याचे कार्य व घेण्यात येणारे सुरक्षितता, वैद्यमापन किंमत छेडछाड व वजन काटे, आरोग्य व औषधे प्रशासन, फसव्या जाहिराती माहिती व इतर प्रशासनातील वेगवेगळ्या विभागात ग्राहकांची फसवणूक झाल्यानंतर त्याबाबतची तक्रार कोठे व कशी करावी त्यासाठीचे शासनाचे हेल्पलाइन क्र. ई दाखिल मोबाईल ॲप व ग्राहक न्यायालयाची ग्राहकांचे हित व हक्कांसाठी चालणारे कामकाजा विषयी मार्गदर्शन झेंडे यांनी करत जनजागृती केली.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत बारामती तालुका संघटक सतीश खंडाळे, सचिव महेश पवार, प्रा. एस. आर. दोशी, डॉ. ए. आर. मुंगी, डॉ. एम. आर. निंबाळकर व प्राचार्य डॉ. एस. व्ही. महामुनी उपस्थित होते.
