December 8, 2025

पोलीस असल्याची बतावणी करत इसमास लुटले.

IMG-20210511-WA0025-686x375

बारामती : बारामती तालुक्यात सातत्याने चोरीचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसून येते आहे आहे, परंतु चोरांकडून चोरी करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवत चोरी करण्यासाठी एका इसमाने बारामती-फलटण महामार्गा लगत चक्क पोलिस असल्याची बतावणी करीत दोन लाख दहा हजार रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.

येथील बारामती फलटण महामार्गा लागत इंडिया ढाब्या समोर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तब्बल २,१०००० ची. चोरी करण्यात आली आहे, त्यामध्ये १,५०,००० एवढ्या किंमतीची चैन व ६०,००० रु. ची तोळयाची अंगठी‌ काढून घेत सर्व वस्तू रूमाला मध्ये बांधून देत घरी गेल्या नंतरच सोडून बघा व पुन्हा सोनं घालू नका असे म्हणत चलाकी करून हे सर्व सोने लंपास केले. त्यासंबधी अधिकची माहिती अशी की, दुचाकीवरून दोन इसम माझ्या मागे येत होते त्यातील एका इसमाने हेल्मेट घातले होते. ते माझ्या मागे येत गाडी थांबावा आम्ही साध्या वेशातील पोलीस आहोत असे म्हणत तुमचे लायसन्स दाखवा व तुम्ही ऐवढे सोने‌ कशाला घेतले आहे, असे म्हणाल्याबरोबर मी लगेच हातात घातलेली अंगठी व चैन खिशात ठेवली त्यातील एक इसमाने ते खिश्यात ठेऊ नका म्हणून माझा‌ रूमाल घेऊन वस्तू त्यामध्ये बांधुन देतो असे म्हणत त्यांनी हात चलाकी करत रुमाल मध्ये तुमची चैन व अंगठी दिली आहे, कोठे थांबू नका चोरांचे प्रमाण वाढले आहे. घरी जाऊन बघा असे म्हणत ते इसम फलटणच्या दिशेने निघून गेले.
मी घरी आल्यानंतर संबंधित रूमाल सोडून पाहायला असता त्यामध्ये दगड आणि गोटे होते नंतर माझ्या लक्षात आले की, त्या दोन इसमांनी हातचलाखी करत चैन व अंगठी चोरी करुन प्रसार झाले. घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यासाठी संबंधितांनी माळेगांव पोलीस स्टेशनला तक्रार केली व दोन अनोळखी इसमांनवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी चोर चोरी करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवत चोरी करीत आहेत, तरी नागरिकांनी जागरूक व सतर्क राहावे.
साध्या वेशातील इसम मी पोलीस आहे असे सांगत असतील तर त्यांची चौकशी करावी व संशय आल्यास तात्काळ नजीकच्या पोलिस स्टेशनला काळवावे असे आवाहन माळेगांव पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!