महंमद पैगंबर (स) साहेब यांच्या जयंती निमित्त बारामतीत रक्तदान शिबिर संपन्न

बारामती : महंमद पैगंबर (स) साहेब यांच्या जयंती निमित्त मुस्लिम बांधवांच्या वतीने भव्य रक्तदान तसेच ज्योतीचंद भाईचंद सराफ बारामती यांच्या सौजन्याने फातीमा मशीद, शगणशाहा मशीद, चांदशाह वली दर्गा मशीद येथे वृक्ष वाटप तसेच सिल्वर ज्युबली सरकारी रुग्णालयात रूग्णांना फळे वाटप व मराठी दिव्य कुराण वाटप अश्या विविध उपक्रमांनी संपन्न झाली.
प्रेषित मोहम्मद पैगंबर (स.) यांचे दिव्य वचन आहे कि.. “ज्याने एखाद्याचा जीव वाचवला, त्याने जणू समस्त मानव जातीला जीवन प्रदान केले” याच वचनाचा आधार घेत बारामतीत मुस्लिम समाज बांधव यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करीत एक संदेश दिला कि मानवी नाते हे रक्ताला बांधील असते. रक्ताला फक्त एकच रंग असतो तो म्हणजे फक्त लाल, जेव्हा माणसाला रक्ताची आवश्यकता भासते तेव्हा रक्ताच्या पिशवीला जातीचे किंवा धर्माचे लेबल नसते…असते ती फक्त मानवी रक्ताची गरज हि गरज फक्त मानवच पुर्ण करू शकतो. आणि ते पूर्ण करने ही माणुस म्हणून आपली नैतिक जबाबदारी समजून येथील स्व .माणिकबाई चंदूलाल सराफ ब्लड सेंटर यांच्या सौजन्याने बारामती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करून 87 रक्त बाटल्याचे संकलन करण्यात आले.
तसेच सर्वच समाज घटकांना इस्लाम धर्माविषयी समज – गैरसमज दुर व्हावे या हेतुने वेगवेगळ्या विषयांवर ज्ञान व माहिती प्राप्त व्हावी या हेतूने जमाते इस्लामी हिंद संघटनेच्या वतीने तसेच सौजन्य महरहूम फरजाना मां फाउंडेशन यांच्या वतीने मराठी भाषांतरित कुराणसह पुस्तके, मोफत भेट देण्यात आली जमाते इस्लामी हिंद संघटनेचे अध्यक्ष आजमोदीन शेख आणि महिला संघटनेच्या अध्यक्ष फरजाना सैय्यद यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
तसेच या रक्तदानासह विविध सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी एमआयएमचे जिल्हा अध्यक्ष फैय्याज शेख, मुनिर तांबोळी, मन्सूर शेख, अॅड. बाबाजान शेख, आरशद शेख,नाझीम मुलानी,रिजवान सैय्यद, जमशेद शेख, हाजी अमजत बागवान, जहीर पठाण, असलम तांबोळी, नाजीम मुलाणी, सोहेल शेख, फरहान बागवान, अहमद शिकीलकर, अन्वर बागवान, नीसार बागवान, हाजीआसिफ बागवान, तसेच अजिज सैय्यद यांनी परिश्रम घेतले.