बारामतीच्या दोन अल्पवयीन मुलींवर पुण्यात सामूहिक अत्याचार

बारामती : बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींच्या अपर्णा अपहरण प्रकरणात वेगळीच माहिती समोर आली आहे या मुलींना दारू पाजत पुण्यातील हडपसर परिसरातील एका खोलीत त्यांच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणात तिघांना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांनी दिली
या प्रकरणी पोलिसांनी ज्ञानेश्वर भारत आटोळे ( वय 27 वर्षे ) यश उर्फ सोन्या शिवाजी आटोळे ( वय 21 दोघेही रा. सावळ तालुका बारामती ) आणि अनिकेत प्रमोद बेंगारे (वय 20 रा. बयाजीनगर रुई बारामती ) असे अटक केलेल्यांची नावे आहेत त्यांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केल्यानंतर बारामती न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
14 सप्टेंबर रोजी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता या दोन्ही मुली शहरातील वेगवेगळ्या शाळांमध्ये नववी मध्ये शिक्षण घेत आहेत मात्र त्या एकमेकींच्या मैत्रिणी आहेत त्या दोघीही दिनांक 14 सप्टेंबर रोजी घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्या त्या बसने पुण्यात पोचल्या जाताना त्यांनी ज्ञानेश्वर आटोळे यांच्याशी संपर्क केला त्याने हडपसर परिसरात दोघा मित्रांना या मुली येत असल्याचे सांगितले मुलीं पाठोपाठ ज्ञानेश्वर आटोळे हा देखील एका मित्राला घेऊन बारामतीतून हडपसरला गेला तेथे एका मित्राच्या खोलीवर या मुलींना नेण्यात आले रात्री पार्टीच्या नावाखाली त्या दोन्ही मुलींना दारूपाजुन मुलींच्या अज्ञानाचा फायदा घेत अटक केलेल्या तिघांसह अन्य एका फरार आरोपीने आळीपाळीने दोन्ही मुलींचे लैंगिक शोषण केले. यातील एका मुलीने हडपसर मधून तिच्या आईला फोन केला आणि आईने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला त्यानंतर घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनुसूचित जातीजमाती प्रतिबंधक, पोक्सो अंतर्गत तसेच इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आवाहन….
लहान मुलांच्या तसेच मुलींच्या बाबतीतील कही गुन्हे किंवा तक्रारी तसेच अत्याचार असतील तर तात्काळ पोलिसांशी किंवा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. सुदर्शन राठोड यांनी केले आहे.