ती घटना दुर्दैवी आहे…खा. सुळे
बारामती : बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कटआउटला काळे कापड लावून निषेध करण्याचा जो प्रयत्न करण्यात आला ती घटना अतिशय दुर्दैवी आहे असे मत खा. सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
काल दि. 10 सप्टेंबर रोजी बारामतीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पोस्टरवर काळे कापड लावल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष यांनीच हे केल्याने शहरात तणाव झाल्याचा प्रश्न विचारल्या नंतर खा. सुळे बोलत होत्या. पुढे सुळे म्हणाल्या की हा महाराष्ट्र शाहू, फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, स्व. यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्र आहे. इथे फार सुसंस्कृत पद्धतीने समाजकारण आणि राजकारण होत आले आहे. आणि जरी आम्ही विरोधी पक्षात असलो तरी बारामतीत झालेली घटना ही दुर्दैवी आहे असेही सुळे म्हणाल्या.
