शारदा प्रांगणची सार्वजनी वापरासाठी परवानगी न देण्याची वंचितची मागणी

बारामती : बारामती शहरातील नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या शाळा क्रमांक 5 व 7 च्या क्रीडा ग्राउंड वर सध्या एकनाथ गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे त्यामुळे सदरच्या शाळेच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याने शारदा प्रांगण या शाळेच्या मैदानाची सार्वजनी परवानगी न देण्याची निवेदनाद्वारे मुख्यधिकारी यांना वंचित बहुजन आघाडीचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी केली आहे.
शारदा प्रांगण या शाळेच्या मैदान हे शांतता झोन असून या मैदानाचा अनेकदा नियम धाब्यावर बसवून बेकायदा वापर केला जात आहे त्यामुळे विध्यार्थ्यांना त्यांच्या मुलभूत हक्का पासुन वारंवार वंचित राहावे लागत आहे. तसेच त्या मैदानाचा शैक्षणिक वापरा व्यतिरिक्त सांस्कृतिक, राजकीय आणि आता फेस्टिवल असा वापर नित्याचा झाला आहे. तसेच अनेकदा आयोजकांकडून नियम धाब्यावर बसवून दिलेल्या परवानगीचे उल्लंघन केले जात आहे.
त्यामुळे यापुढे या शाळेच्या मैदानाची परवानगी कोणालाच कोणत्याही प्रयोजनासाठी देऊ नये अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या वेळी वंचितचे निकाळजे यांच्यासह जितेंद्र कवडे, कृष्णा साळुंखे, विनय दामोदरे, सुरज कोरडे आदी उपस्थित होते