बारामतीतील कार्यक्रमात शरद पवारांसह, खा.सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवारांना निमंत्रणच नाही
बारामती : बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मंगळवार) दि.10 सप्टेंबर रोजी मध्यवर्ती सभागृहाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला बारामतीच्या खासदार म्हणून सुप्रिया सुळे, आमदार म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रितच केले नसल्याबद्दल व बॅनर वर नावे देखील नमूद केली नसल्याबद्दल खा. सुप्रिया सुळे यांनी एक्स या समाजमाध्यमात ट्विट करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
खा. सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये असे नमूद केले आहे की, बारामती येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज शासनाच्या ( महाविध्यालायाच्या ) वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ही आनंदाची बाब आहे. मात्र या कार्यक्रमाचा बॅनर पहिला असता आश्चर्य वाटले. या बॅनरवर आदरणीय पवार साहेब, उपमुख्यमंत्री व बारामतीचे आमदार अजित पवार आणि माझेही नाव नाही. यासोबत आदरणीय पवार साहेब व मला या कार्यक्रमाचे निमंत्रण देखील नाही. निमंत्रण असते तर आम्ही आनंदाने कार्यक्रमाला आलो असतो, कार्यक्रमाच्या ठिकाणी आयोजकांनी प्रोटोकॉल पाळला नाही, तर यात जी नवे नमूद आहेत ती नोमक्या कोणत्या प्रोटोकॉलमध्ये बसतात असा सवाल उपस्थित करीत, हा देश संविधानावर चालतो, त्यामुळे महाराष्ट्र सरकारणे प्रोटोकॉलच्या नियमांमध्ये काही बदल केले असतील तर सरकारने आम्हांला अवगत करावे असेही सुळे यांनी नमूद केले आहे.
