बारामती लय पुढची…माझंही एकत नाही…. अजित पवार.
बारामती : बारामतीला फार शिकवायला जाऊ नका..लय पुढची बारामती माझं एकत नाही… निवडणुकीला सामोरे जाताना त्यांच्या कल पाहून बारामती करांना सामोरे जा बारामती करांना त्यांचा मानसन्मान दिलाच पाहिजे असे आवाहन कार्यकर्त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला बारामतीत दिला.
पुढे बोलताना पवार म्हणाले की जर तुम्ही बारामती करांना वेगळ्या पद्धतीने सांगायला गेला तर ते म्हणतील हा कोण टिकोजीराव आलाय मला सांगायला. आणि असे झाले तर ते बारामतीकर आहेत ते लावतील मार्गी…. जमिनीवर पाय ठेऊन बारामती करांना सामोरे जा असेही पवार म्हणाले.
तर साहेबांनी स्वतःकडे कधी अर्थ खाते ठेवले नाही साहेबांकडे मुख्यमंत्री, गृह, कृषी, उद्योग, शिक्षण, अन्न नागरी पुरवठा खातेही काही काळ सांभाळले आहे. मात्र मी अर्थमंत्री स्वीकारण्याचे कारण आहे की निधी विकासासाठी कसा देता येतो यासाठी मी अर्थ खाते घेतल्याचे तसेच अर्थ आणि नियोजन खाते घेतल्यामुळेच आपल्या भागाचा कायापालट झाल्याचे पवारांनी व्यक्त केले.
मात्र बारामतीचा एवढा विकास करून बारामतीकर वेगळा निर्णय घेणार असतील तर झाकली मुठ सव्वा लाखाची आपण पहिल्या पासून लाखांच्या फरकाने निवडून येणारे आता माझे वय 65 वर्षे झाले आहे मी आता समाधानी आहे. जिथे पिकते तिथे विकत नसते…त्यामुळे कार्यकर्त्यांनी हलक्यात घेऊ नका केलेली विकास कामे आणि सरकारी योजना मतदारांना समजावून सांगा असेही पवारांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. शेवटी मतदार राजा आहे त्यांना आपण बळजबरी करू शकत नाही त्यांच्या मनात असेल तेच होणार मात्र ही बारामतीच्या भवितव्याची ही निवडणूक असणार आहे असेही व्यक्त केले.
