October 24, 2025

त्यांना त्यांच्या काकांनी संधी दिली… मला माझ्या काकांनी संधी द्यावी…युगेंद्र पवार

Ajit-Pawar-nephew-yogendra-pawar

बारामती : त्यांना त्यांच्या काकांनी संधी दिली मला माझ्या काकांनी संधी द्यावी असे मत विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीला दुसरा आमदार मिळावा मग दोघांच्या कामाची तुलना करावी असे व्यक्त केले होते त्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना युगेंद्र पवार बोलत होते.

अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेनंतर युगेंद्र पवारांची स्वाभिमान यात्रा

 लोकसभा निवडणुकीप्रमाणेच बारामतीत विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापु लागले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेनंतर राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने युगेंद्र पवार यांच्या ‘स्वाभिमान यात्रेचे’ नियोजन करण्यात आले आहे. उद्या (दि १०) पासून या यात्रेची सुरवात होत आहे.

कण्हेरी येथील मारुती मंदिर येथे दर्शन घेऊन सकाळी ९ वाजता युगेंद्र पवार आपल्या यात्रेची सुरवात करणार आहेत. त्यानंतर ९.१५ वाजता माळावरच्या देवीचे दर्शन घेऊन ते पक्ष कार्यालयात १२ वाजेपर्यंत उपस्थित राहून नागरिकांच्या गाठीभेटी घेतील. दुपारी २ वाजता मुढाळे येथील बैलगाडा शर्यतीस भेट, ३ वाजता माळेगांव बुद्रुक, ४ वाजता गोफणे व वाघमोडे वस्ती, ५ वाजता माळेगांव कारखाना, ६ वाजता  येळे ढाळे वस्ती येथे भेट असा त्यांचा दौरा असणार आहे.

महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे कधीही झुकला नाही

ही स्वाभिमानी यात्रा १२ दिवसांची असून  बारामती तालुक्यातील सर्व गावांना युगेंद्र पवार भेटी देणार आहेत. पक्षाच्या वतीने या यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा हात स्वत:च्या घेतलेले छायाचित्र या स्वाभिमान यात्रेच्या पोस्टरवर छापण्यात आले आहे. ‘आदरणीय शरद पवार साहेब यांच्या आशीर्वादाने आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ या आपल्या पक्षाचा आणि ‘पवारसाहेबां’चा पुरोगामी प्रागतिक विचार बारामती विधानसभा मतदारसंघात सर्वदूर पोहोचविणे हा या यात्रेचा उद्देश आहे. यामध्ये जनतेशी मुक्त संवाद करणार आहे. साहेबांनी सांगितल्या प्रमाणे ‘महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे कधीही झुकला नाही, ना यापुढे झुकेल’ या स्वाभिमानी विचाराचा जागर करण्यासाठी, या विचारांशी एकनिष्ठ असणाऱ्यांचे मनोबल आणखी वाढविण्यासाठी, त्यांना ताकद देण्यासाठी बारामतीकरांना भेटणार आहे. तसेच लोकसभेत दिलेल्या साथीबद्दल बारामती तालुक्यातील जनतेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे. बारामतीकरांनी या यात्रेमध्ये अवश्य सहभागी व्हावे.यात्रेच्या निमित्ताने स्वाभिमानी विचारांचा चौफेर जागर करुया’, असे आवाहन पवार यांनी केले आहे.

You may have missed

error: Content is protected !!