October 24, 2025

बारामतीला मी सोडून दुसरा आमदार मिळायला हवा…..मग..? …. उपमुख्यमंत्री अजित पवार

IMG-20240908-WA0084

बारामती : मीही ६५ वर्षांचा झालोय, मी समाधानी आहे.,  जिथे पिकतं,… तिथे विकत नसतं,  बारामतीकरांना मी सोडून दुसरा आमदार मिळायला हवा,… मग तुम्ही ९१ ते २०२४ च्या माझ्या कारकि‍र्दीची आणि त्या नव्या माणसाच्या कारकि‍र्दीची तुलना करा… असे आपल्या उमेदवारी बाबत भाष्य करू इच्छीनाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना…आम्हाला दादाच पाहिजेत अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी अजित पवारांसमोर सुरु करीत कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना निरुत्तर केले.

कसबा येथील राष्ट्रवादी कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत  पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे करण्यात आला होता त्यावेळी पवार बोलत होते यावेळी वंचित बहुजन आघाडीचे बारामती तालुक्याचे माजी सचिव विक्रम थोरात यांच्या नेतृत्वात योगेश मोटे, सचिन थोरात, संदिप गाढवे, नितीन चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

अजित पवार उमेदवारी बाबत भाष्य करीत असतानाच कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी सुरु केली एकच वादा,… अजित दादा, त्यामुळे काही मिनिटे कार्यकर्त्यांनी अजित पवारांना बोलूच दिले नाही, तर न सांगता रस्ता होतोय, पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत, तर  बारामती मतदारसंघात 750 कोटी रुपयांपेक्षा अधिकची विकासकामं सुरू आहेत, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.  “यापूर्वी बारामती तालुक्यातील रस्ते कसे होते. आता कसे आहेत, काही खराब आहेत ते कसे चांगले करायचे ते पाहू. मेडिकल कॉलेज न मागता मिळालं. तुम्ही सांगितलं, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव द्या मग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेज असं नाव केले आहे”  अजित पवार यांनी असेही व्यक्त केले.

कार्यकर्त्यांना संबोधीत करताना, “कार्यकर्त्यांच्या जोरावरच पक्ष चालतो याची मला जाणीव आहे. कार्यकर्ता पक्षाचा कणा असतो. त्यांनी काम नाही केलं तर गडबड होते, हे मान्य केलंच पाहिजे. कोणतीही निवडणूक असो किंवा आजची बैठक असो, कार्यकर्त्यांच्या जिवावरच निवडणूक आणि यश अवलंबून असते. माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते आता उपमुख्यमंत्रिपदापर्यंत अनेक जबाबदाऱ्या मला कार्यकर्त्यांमुळेच मिळाल्या आहेत” असेही अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत जनता दरबार भरवला होता. बारामतीच्या कसबा येथील राष्ट्रवादी कार्यालयात त्यांनी मेळाव्याला संबोधित केलं. तसेच, अजित पवार यांच्या उपस्थितीत अनेकांचे पक्षप्रवेश पार पडले. अजित पवारांनी आपल्या बारामती दौऱ्यात अखिल तांदूळवाडी वेस तरूण मंडळ आयोजित श्रीमंत आबा गणपती मंडळ,  नटराज नाट्य कला मंडळ आयोजित बारामती गणेश फेस्टिवल आणि अनंत युवा प्रतिष्ठान आयोजित “गणेश फेस्टिव्हल २०२४” ला भेटी दिल्या. यावेळी खासदार सुनेत्रा पवार  त्यांच्या सोबत उपस्थित होत्या.

 

You may have missed

error: Content is protected !!