शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे रक्तदान शिबिर संपन्न

बारामती : येथील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय बारामती येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले.
बारामती आणि परिसरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने गरजु रुग्णांना रक्त पुरवठा करणे अश्यक्य झाले होते त्या अनुषंगाने तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात महाविद्यालयाचे विद्यार्थी, शासकीय कर्मचारी यांनीही सहभाग घेतला. या वेळी 83 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान केले. रक्तसंकलन येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित लेट माणिकबाई चंदुलाल सराफ ब्लड सेंटर बारामती यांनी केले.
या कार्यक्रमाचे उदघाटन उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी हनुमंत पाटील, यांच्या हस्ते तसेच उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमोल शिंदे, शरीरविकृतीशास्त्र विभाग प्रमुख व कार्यक्रमाच्या आयोजिका डॉ. शारदा राणे, रक्तपेढीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. डी.एन.धवडे, महिला रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. बापु भोई आदी मान्यवर उपस्थित होते तर सहाय्यक प्राध्यापिका डॉ. शीतल लोंढे, डॉ. विजया लोहारे, टेक्निकल सुपरवायजर, लहू तांदळे, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक विनोद गायकवाड तसेच शरीरविकृतीशास्त्र विभागाचे सर्व कर्मचारी यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.