October 24, 2025

हिम्मत असेल तर समोर या.. अजित पवारांनी विरोधकांचा घेतला समाचार

WhatsApp Image 2024-09-02 at 4.48.13 PM

बारामती : “राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, जे घडायला नको होते, ते घडले,  मी त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली, मात्र यात ज्या कोणाची चूक असेल, त्याला शोधून काढू. जो कुनी चुकीचा असेल त्याला सोडणार नाही. तर महाराजांच्या नावाला साजेसं भव्य स्मारक पुन्हा उभारण्यात येईल” मात्र “या घटनेचे विनाकारण राजकारण करु नका, काहींनी जोडे मारो आंदोलन केले, आमच्या फोटोला जोडे मारले, जर हिंमत असेल तर समोर या, मीही बघतो, , अशा भाषेत अजित पवारांनी विरोधकांना सज्जड दम भरत विरोधकांच्या आंदोलनावर निशाणा साधला.

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसची जन सन्मान यात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अजित पवारांनी विरोधीपक्षांचा समाचार घेतला. या वेळी अजित पवारांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करीत. कोणत्याही सरकारला आपल्या कार्यकाळात अश्या घटना घडावी असे वाटणार नाही “छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचेच दैवत आहेत, मात्र पुतळा कोसळल्यावरुन राजकारण करु नका” सबुरीचा सल्लाही  दिला.

आता पुढे काय करायचं, हे तुम्ही ठरवा बारामतीकरांना आवाहन

“लवकरच बारामतीत कॅन्सर रुग्णांसाठी रुग्णालय करण्यात येणार आहे. आयुर्वेदिक महाविद्यालयाचे काम अंतिम टप्यात आहे, लोकसभा निवडणुकीच्या काळात संविधान बदलणार असा चुकीचा प्रचार केला गेला, मला तुम्ही पाच वर्ष निवडून दिले आहे, मी कोठ्यावधी रुपयांची कामे केली, त्यामुळे पुढे काय करायचे, हे तुम्ही ठरवा. मी केलेल्या कामाचे पुस्तक काढून तुम्हाला देणार आहे”, असेही आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती करांना केले.

लईच पवार घरी यायला लागलेत…

लोकसभा निकालाचा आणि निवडणुकीचा उल्लेख करत तुम्ही मतदारांनी जो निर्णय घेतला तो तुमचा अधिकार होता तर जे झाले ते गंगेला मिळाले, असे व्यक्त करीत हल्ली बारामती करांच्या लईच पवार घरी यायला लागले आहेत, या पूर्वी असे होत नव्हते अशी टिप्पणी बोलताना पवारांनी व्यक्त केली.

यात्रा जन्संमान, … जन मात्र वैतागला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामतीत जनसन्मान यात्रा असल्याने त्या यात्रेला अनेक महामंडळाच्या एस.टी बुक करण्यात आल्या होत्या, त्या धांदलीत शाळकरी विद्यार्थी आणि महाविद्यालयीन यांची मात्र कुचंबणा झाली,  नेहमी येणारी एसटी यात्रे दिवशी आलीच नाही, त्यामुळे अनेक विध्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयाला दांडी मारावी लागली. तर महिलांना गावातुन सकाळी लवकर बसेसने यावे लागले त्यातच कार्यक्रम लांबला त्यातच शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने कार्यक्रमा नंतर त्याच बस मधुन पुन्हा सोमेश्वाराचे दर्शन त्यामुळे काही महिला खुश तर काही घरग्रहस्तीच्या कामाच्या चिंतेने व्याकूळ झाल्या होत्या. तर यात्रे दरम्यान प्रशासनाने वाहतुकीचा नियोजना अभावी खेळ खंडोबा केला होता त्यामुळे शहरातील सर्वच रस्ते वाहनांनी तुंबले होते.

त्या नाराधामांचे…. कटिंग करून टाकायला पाहिजे.

महिला मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे तर जे नराधम माणुसकीला काळीमा फासतात त्यांना फाशीची शिक्षा तर झाली पाहिजे मात्र तोपर्यंत त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सरळ कटिंग करून टाका ….अशी कृती केल्याशिवाय हे नराधम सरळ होणार नाहीत अश्या शब्दात महिलांवार अत्याचार करणारांविषयी पवारांनी भावना व्यक्त केल्या.

कितीही मोठ्या बापाचा असो , मुलायजा ठेवायचा नाही..

जर शहरात कोणी महिला आणि मुलींची छेड काढली अत्याचार केला तर तो कितीही मोठ्या बापाचा असो मुलायजा ठेवायचा नाही, मी चुकीच्या गोष्टी खपवून घेणार नाही, त्या गुन्हेगारांना आणि दोन नंबरचे धंदे करणारांना पाठीशी घालू नाका अशा सूचना पोलिस प्रशासनाला दिल्या आहेत असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केले.

You may have missed

error: Content is protected !!