बारामतीत युवकाचा धारदार शस्त्राने खून

बारामती : बारामती शहरातील जळोची येथे राहणाऱ्या गणेश वाघमोडे या युवकाचा डोक्यात वर्मी घाव घालून खून केला केल्याची घटना बारामतीत घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे.
दि. 21 रोजी नऊच्या सुमारास ही घटना समोर आली होती. जळोची जवळ असलेल्या काळा ओढा परिसरात ही घटना घडली आहे. मयत गणेश वाघमोडे हा वाढदिवसाची खरेदी करून घरी जात असताना त्याला गाठून धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यात आणि मानेवार वर्मी वार करून जीवे ठार मारले असून बारामतीतील पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच पोलीसांचा फौजफाटा घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचला होता.
यातील मयत गणेश वाघमोडे याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल असल्याचे पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून समोर आले आहे. मयत गणेश वाघमोडे अल्पवयीन असतानाच त्याने पोलिस दप्तरी चर्चेत होता. त्यात आता त्याचाच खून झाल्याची घटना घडली आहे. तर पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपी जयेश बाळासाहेब माने, शुभम गायकवाड, करण जाधव, अविष गरुड, सोमनाथ जाधव, भोल्या व इतर यांच्या विरुद्ध फिर्यादी नवनाथ चोरमले यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.