October 24, 2025

एससी,एसटी आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधात बुधवारी ‘बारामती बंद’ ची हाक

pjimage-3-2

बारामती : मा.सर्वोच्च न्यायालायने एससी, एसटी समाजाच्या आरक्षणाला क्रिमीलेयर लावण्याचा व त्याचे वर्गीकरण करण्याचा अधिकार केंद्र व राज्य सरकारला देत असल्याचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय एससी एसटी समाजात फूट पडणारा व त्यांची एकता तोडणारा असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णया विरोधात बुधवारी ( दि.21 ऑगस्ट रोजी ) देशभरातील एससी एसटी समाजाने भारत बंद ची हाक दिली आहे.

त्या पार्श्वभूमीवर बारामतीतील एससी एसटी समाजाच्या वतीने या भारत बंदला समर्थन देण्यासाठी बुधवारी बारामती बंदचे आवाहन करण्यात आले असून,  निषेध मोर्चाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. हा निषेध मोर्चा सकाळी 10 वाजता शहरातील आमराईतील सिद्धार्थ नगर येथून सुरु होणार असून मुख्य बाजारपेठेतून पुढे जात तीन हत्ती चौक या ठिकाणी निषेध सभेने या मोर्चाची सांगता होणार आहे.

You may have missed

error: Content is protected !!