निरंकारी मिशनच्या भक्तांनी साजरा केला मुक्ती पर्व दिवस
इंदापूर : 15 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देशात स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो. तर सद्गुरु माता सुदिक्षा जी महाराज त्यांच्या कृपेने निरंकारी जगतात हा दिवस आध्यात्मिक स्वातंत्र्याचा उत्सव म्हणून ‘मुक्ती पर्व दिवस’ साजरा केला जातो.
हा मुक्ती पर्व दिवस या निमित्ताने इंदापूर येथील सत्संग भवनात गुरुवारी (ता. 15) विशेष सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्संग सोहळ्यास सेक्टर संयोजक तथा ज्ञान प्रचारक महादेव शिंदे तसेच आजूबाजूंच्या शाखांचे मुखी सेवादल अधिकारी सेवा दल तसेच निरंकारी जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.
या सत्संग च्या अध्यक्षस्थानी संत निरंकारी मिशनचे जेष्ठ प्रचारक प्रा. सुरेश पोळ (सांगली) हे होते. त्यांनी उपस्थित जनसमुदायाला संबंधित करताना म्हणाले जोपर्यंत माणूस प्रपंचातून मुक्त होणार नाही तोपर्यंत मनुष्य जीवनाला मुक्ती नाही. असे सांगून पुढे म्हणाले प्रत्येकाला परमार्थ हे समजलंच पाहिजे. परमार्थ म्हणजे जीवनाचा परम अर्थ कळणे म्हणजे परमार्थ होय, जसं की सूर्य उगवल्यानंतर जगण्यास सुरुवात होते त्याचप्रमाणे भक्तांच्या जीवनात सद्गुरु आल्यानंतर परमार्थाला सुरवात होते.
यावेळी निरंकारी बंधू-भगिनींनी आपले विचारांमधून जीवन जगण्याबरोबरच एकत्वाचा संदेश दिला. तसेच ज्यांनी मानवतेच्या कल्याणासाठी आपले जीवन समर्पित करून मुक्तीचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या दिव्य विभुतींच्या प्रति आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
हा ‘मुक्ती पर्व’ चा विशेष सत्संग सोहळा व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर शाखेचे मुखी, सेवादल अधिकारी सेवादल व सेवादल भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले. तर मंच संचलन सतीश महाडिक यांनी केले.
