बारामतीत वैद्यकीय व्यवसायीकांचा बंद व मूकमोर्चा

बारामती : कलकत्ता येथील मेडिकल कॉलेजमध्ये पदव्युत्तर पदवीधर तरुणीवर क्रूरपणे बलात्कार करून तिची अमानुषपणे हत्या करण्यात आली. यामुळे फक्त वैद्यकीय क्षेत्रासह संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. त्या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन बारामतीच्या वतीने बंद पुकारण्यात आला आहे. तसेच मुक मोर्चा काढण्यात आला होता.
कोलकाता येथील मेडिकल कॉलेजमधील स्त्री डॉक्टर वर झालेल्या क्रूर गुन्हेगारी आणि स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आंदोलक विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला पार्श्वभूमीवर, इंडियन मेडिकल असोसिएशनने बंद पुकारण्यात आला आहे दरम्यान वैद्यकीय व्यवसायीकांच्या वतीने निषेध मुक मोर्चा काढण्यात आला होता, हा मुक मोर्चा येथील शारदा प्रांगण ते प्रशासकीय भवन असा मोर्चा काढण्यात आला. यावेळी संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
आधुनिक वैद्यकशास्त्राच्या डॉक्टरांच्या (ॲलोपॅथी) देशव्यापी सेवा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. सर्व अत्यावश्यक सेवा मात्र सुरू ठेवल्या जातील. अपघातग्रस्तांना आकस्मिक सेवा दिली जाईल. परंतु नियमित बाह्य रुग्ण विभाग बंद असणार आहेत तसेच वैकल्पिक, तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रियाही केल्या जाणार नाहीत. ज्या ठिकाणी आधुनिक वैद्यक डॉक्टर्स सेवा देत आहेत त्या सर्व क्षेत्रांमधील सेवा २४ तासांसाठी बंद राहतील. अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन बारामती शाखेच्या वतीने अध्यक्ष डॉ. साधना कोल्हटकर ,सचीव डॉ निकीता मेहता व खजिनदार डॉ प्रियांका आटोळे,यांनी माहीती दिली आय.एम.ए, राज्याचे माजी अध्यक्ष डॉ.अशोक तांबे, मेडिकोज गिल्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र चोपडे, निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ. वैभव काटे, होमिपथी असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. नीलम श्रीरकांडे, डेंटल असोशीएशनचे अध्यक्ष डॉ. प्रीतेश दोशी डॉ. सोनिया शहा यांनी निषेधाला पाठिंबा दिला आहे.
यावेळी युवा नेते युगेंद्र पवार यांनी डॉक्टरर्स संघटनेच्या पदाधिकारी यांची भेट घेऊन, चर्चा केली. तसेच झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करून भविष्यात योग्य कारवाईसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले . बारामतीतील अनेक केमिस्ट असोसिएशन, लॅब असोसिएशन तसेच मेडिकल रिप्रेझेनटेटीव्ह असोसिएशन यांनी पाठींबा दिला.