वैद्यकीय व्यावसायिकांचा उद्या बंद

Senior male caucasian doctor with stethoscope in medical scrubs holding electronic tablet for saying hospital is closed due to coronavirus
बारामती : कलकत्ता येथील आर जी कार मेडिकल कॉलेजमध्ये पदव्युत्तर पदवीधर तरुणीवर क्रूरपणे बलात्कार करून तिची अमानुषपणे हत्या करण्यात आली. यामुळे फक्त वैद्यकीय क्षेत्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. त्या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने उद्या दि.17 ऑगस्ट रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. त्याचाच भाग म्हणून बारामतीत देखील बंद पुकारण्यात आला आहे.
कोलकाता येथील आर जी कार मेडिकल कॉलेजमधील स्त्री डॉक्टर वर झालेल्या क्रूर गुन्हेगारी आणि स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आंदोलक विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला पार्श्वभूमीवर, इंडियन मेडिकल असोसिएशनने आज शनिवारी 17 ऑगस्ट रोजी निषेधदिन पाळून सकाळी ६ वाजेपासून ते रविवार 18 ऑगस्ट सकाळी ६ वाजेपर्यंत २४ तासांसाठी आधुनिक वैद्यकशास्त्राच्या डॉक्टरांच्या (ॲलोपॅथी) देशव्यापी सेवा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. सर्व अत्यावश्यक सेवा मात्र सुरू ठेवल्या जातील. अपघातग्रस्तांना आकस्मिक सेवा दिली जाईल. परंतु नियमित बाह्य रुग्ण विभाग कार्य करणार नाहीत आणि वैकल्पिक, तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रियाही केल्या जाणार नाहीत. ज्या ठिकाणी आधुनिक वैद्यक डॉक्टर्स सेवा देत आहेत त्या सर्व क्षेत्रांमधील सेवा २४ तासांसाठी बंद राहतील. अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन बारामती शाखेच्या वतीने अध्यक्ष डॉ. साधना कोल्हटकर ,सचीव डॉ निकीता मेहता व खजिनदार डॉ प्रियांका आटोळे,यांनी माहीती दिली आय.एम.ए. राज्याचे माजी अध्यक्ष डॉ.अशोक तांबे, मेडिकोज गिल्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र चोपडे, निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ. वैभव काटे, होमिपथी असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. नीलम श्रीकांडे, डेंटल असोशीएशनचे अध्यक्ष डॉ. प्रीतेश दोशी यांनी निषेधाला पूर्ण पाठिंबा दिला आहे.
बारामतीत २४ तासांसाठी आधुनिक वैद्यकशास्त्राच्या डॉक्टरांच्या (ॲलोपॅथी) देशव्यापी सेवा बंद ठेवण्यात आल्या असून मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, येथील शारदा प्रांगण येथुन मूक मोर्चाला प्रारंभ होईल ते थेट प्रशासकी भवन येथे डॉक्टरांच्या मोर्चा जाणार आहे तेथे प्रशासनाला निवेदन देऊन घटनेचा निषेध करण्यात येणार आहे.