मुख्याधिकारी यांना आत्मदहनाचा इशारा

बारामती : अनधिकृत बंधाकावर कारवाई करावी आणि मुख्याधिकारी यांनी घेतलेल्या सुनावणीचे इतिवृत्त मिळावे तसेच दप्तर दिरंगाई करणाऱ्या कर्मचारी यांच्यावर सेवाहमी कायद्यानुसार कारवाई करण्याच्या मागणीवरून समीर ढोले यांनी बारामतीचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
समीर ढोले यांनी बारामतीमध्ये वार्ड क्र. ८ मधील गट क्रमांक २२३ मध्ये अनाधिकृत बांधकामा बाबत तक्रार दिली होती त्यानुसार स्थानिक पोलिस प्रशासन आणि नगरपालिका यांच्या सामोपचाराने नगरपालिकेत सुनावणी ठेवण्यात आली होती त्या बेकायदा बांधकामावर कारवाई व्हावी तसेच मुख्याधिकारी यांनी घेतलेल्या सुनावणीचे इतिवृत्त मिळावे तसेच दप्तर दिरंगाई करणाऱ्या कर्मचारी यांच्यावर सेवाहमी कायद्यानुसार कारवाई करण्याच्या मागणीवरून समीर ढोले यांनी मुख्याधिकारी महेश रोकडे यांना आत्मदहनाचा इशारा दिला आहे.