आओ गाव चले अंतर्गत मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर संपन्न

या तपासण्या एका ओबेसिटी रथ नावाच्या सर्व उपकरणाने सुसज्ज अशा मोबाईल व्हॅनमध्ये करण्यात आल्या सर्वप्रथम नगरपरिषदेमध्ये हा उपक्रम पार पडला त्यानंतर बारामती मधील प्रशासकीय भवन येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी तहसीलदार गणेश शिंदे व मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सहकार्य केले. त्यानंतर कचरा वर्गीकरण केंद्र एमआयडीसी येथे व सोनकसवाडी ग्रामस्थ तसेच बारामतीतील डॉक्टरांच्या या उपक्रमामध्ये रक्ताच्या काही मोफत तपासण्या करण्यात आल्या अशा 400 हून अधिक नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या.
जीवन शैलेशी निगडित आजारांचे या उपक्रमात तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, यूरिक ॲसिड, लठ्ठपणा यांचे लवकर निदान होऊन समाजात याविषयी जागृती होण्यास मदत झाली. ओबेसिटी फ्री नेशन हा या उपक्रमामाचा मूळ उद्देश होता. तर बारामतीतील डॉक्टरांसाठी डॉ. संजय बोरुडे डॉ. राहुल बोरुडे, डॉ. सुरज जाधवर, डॉ. आदित्य देशपांडे यांचे लठ्ठपणाशी निगडित अनेक अडचणी व त्यावर मात करणाऱ्या उपचारांविषयी तसेच शस्त्रक्रियांविषयी इंडियन मेडिकल असोसिएशन व जे. एक्स. एल. फाउंडेशन यांच्यावतीने बारामती क्लब येथे वैद्यकीय कॉन्फरन्सचे देखील आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या संख्येने डॉक्टर्स उपस्थित राहिले, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. साधना कोल्हाटकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर सचिव डॉ. निकिता मेहता यांनी उपस्थितांचे आभार मानले. आयएमएचे महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. अशोक तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आयएमएचे सर्व डॉक्टर्स व एक्झिक्यूटिव्ह सदस्य डॉ. एम. आर. दोशी, डॉ. अमर पवार, डॉ. अविनाश आटोळे, डॉ. प्रियंका आटोळे डॉ. सुप्रिया गदादे, डॉ. वर्षा सिधये, डॉ. सौरभ मुथा, डॉ. दीपिका कोकणे, डॉ. अंजली खाडे, डॉ. शरयू धुरगुडे, डॉ. संतोष घालमे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.