बारामती रोटरी क्लबच्या वतीने गरजूना छत्र्यांचे वाटप

बारामती : रोटरी डिस्ट्रिक्टच्या छत्रछाया प्रकल्पाच्या अंतर्गत बारामती रोटरी क्लबच्या वतीने गरजूना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ बारामतीचे अध्यक्ष अरविंद गरगटे, सचिव रविकिरण खारतोडे, सहाय्यक प्रांतपाल दत्ता बोराडे, पब्लिक इमेज डायरेक्टर प्रा. डॉ. अजय दरेकर रोटरी डिस्ट्रिक्टचे ट्रेनर प्रा. डॉ. हणमंत पाटील, सेवा प्रकल्प संचालक सचिन चावरे आदी मान्यवर उपस्थित होते.
रोटरी वर्ष 2024-2025 वर्षासाठीचे डिस्ट्रिक्टचे प्रांतपाल शीतल शहा यांचा “छत्रछाया” प्रकल्प हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पामध्ये पुणे आणि रायगड जिल्ह्यातील सुमारे 150 रोटरी कलबच्या वतीने गरजू व्यक्तींना आणि छोटया व्यवसायिकांना मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात येत आहे. बारामती रोटरी क्लबच्यावतीने अशा 20 व्यक्तींची निवड करण्यात आली असून यातील पहिल्या टप्प्यातील गरजूना छत्र्यांचे वाटप करण्यात आले आहे.
यामध्ये 1. सुशीला सातपुते, ऐश्वर्या कॉर्नर, बारामती, 2. आकांक्षा अतुल क्षीरसागर, श्रीराम नगर, बारामती 3. सुमन त्रिंबक जमदाडे, इंदापूर चौक, बारामती, 4. ज्ञानेश्वर अंकुश म्हस्के, कारखाना रोड,माळेगाव, 5. जानकी सावळराम धोत्रे, माळेगाव यांना त्यांच्या व्यवसायाच्या जागेवर जाऊन छत्री प्रदान करण्यात आली. रोटरीच्या छत्रछाया प्रकल्पामुळे या व्यक्तींना पाऊस, आणि उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा अध्यक्ष अरविंद गरगटे यांनी व्यक्त केली.
रोटरी छत्रछाया प्रकल्पामध्ये रोटरी क्लब ऑफ बारामतीने छत्री प्रदान केल्याबद्दल सर्व लाभार्थीनी बारामती रोटरी क्लबचे आभार व्यक्त केले.