चिऊशेठ जंजिरे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी संपन्न

बारामती : स्वप्निल विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते चिऊशेठ जंजिरे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
स्वप्निल विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाचे अध्यक्ष चिऊशेठ उर्फ हनुमंत जंजिरे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वप्निल विष्णुपंथ चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये शालेय विध्यार्थ्यांसाठी शाळेला पंखे वाटप, बोर्डिंग होमच्या विध्यार्थ्यांसाठी भोजन वाटप, तसेच रुग्णांना फळे वाटप, शालेय विध्यार्थ्यांना खाऊ वाटप अश्या विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. सुधीर पाटसकर व सामाजिक कार्यकर्ते अनिकेत मोहिते यांच्या हस्ते तर दैनिक पुढारीचे वृत्तपत्राचे विभागीय प्रमुख राजेंद्र गलांडे, दैनिक केसरीचे प्रतिनिधी सोमनाथ कवडे, सा. वतन की लकीरचे संपादक तैनुर शेख, सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत चव्हाण, सामजिक कार्यकर्ते भास्कर दामोदरे, राष्ट्रवादी युवक (एस.पी ) उपाध्यक्ष गौरव आगवणे, संकेत आगवणे, गौतम थोरात, अजय कडाळे, अभिजित पांढरे, मयूर पांढरे, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन स्वप्निल विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाचे नरेंद्र मिसाळ, विठ्ठलशेठ आगवणे, तसेच मंडळाचे इतर सदस्य यांनी केले होते.