विद्या प्रतिष्ठानच्या इंग्रजी माध्यम प्रशालेत कारगिल विजय दिवस साजरा

बारामती : बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या इंग्रजी माध्यम विद्यालय, विद्यानगरी येथे प्रशाला व जयहिंद फाउंडेशन, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल विजय दिवस साजरा कारण्यात आला.
विद्या प्रतिष्ठान संस्थेचे रजिस्ट्रार कर्नल श्रिश कंबोज, प्राचार्या राधा कोरे ,कॅप्टन रविंद्र लडकत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. प्रशालेचे एनसीसी विभाग प्रमुख तुषार टांकसाळे , अधिकारी प्रांजल खटके व जयहिंद फाउंडेशन सदस्य अशोक घोडके यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
प्रशालेतील एनसीसी युनिटच्या विद्यार्थ्यांना कर्नल श्रीश कंबोज, प्राचार्य राधा कंबोज, जयहिंद फाउंडेशन, बारामतीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी मार्गदर्शन केले. सैनिकी जीवन, त्यांचा त्याग, बलिदान, त्यांच्या कुटुंबियांचे जीवन याविषयी माहिती दिली. त्यांच्या त्यागाची जाणिव ठेऊन आपण त्यांना सन्मान देणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले. जयहिंद फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची माहिती सांगून आपण सर्वांनी देशसेवा म्हणून आपापली कर्तव्ये मनापासून करण्याविषयी मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
या प्रसंगी जयहिंद फाउंडेशन बारामतीचे उपाध्यक्ष सतीश झगडे, सचिव सचिन कुंभार, सदस्य अशोक घोडके, दादा माळवे, रणजित जगदाळे व प्रा. सचिन तावरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनींनी केले. तर अधिकारी प्रांजल खटके यांनी उपस्थितांचे आभार मानले.