मराठा महासंघाच्या वतीने विविध मागण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन

बारामती : विद्यार्थी तसेच इतर विविध मागण्याच्या संदर्भाचे निवेदन आखिल भारतीय मराठा महासंघ बारामती यांच्यावतीने तहसीलदार गणेश शिंदे यांना देण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ बारामतीचे तालुका अध्यक्ष संभाजी माने, हनुमंत भापकर, कुमार चव्हाण, सागर खलाटे, संदीप मोहिते, अमित भापकर, सुदर्शन निचळ आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने नव्याने मराठा बांधवाना एस. ई. बी. सी तसेच कुणबी ओबीसी दाखले देण्याच्या प्रक्रियेत गती द्यावी तसेच जातपडताळणी करताना येणाऱ्या गंभीर अडचणी व जातपडताळणी करण्यासाठी बारामती तालुकातील सर्व विध्यार्थी तसेच पालकांना पुणे येथे जाऊन अडचणीचा सामना करावा लागत आहे. या अडचणी दूर करण्यासाठी पुणे येथील समाज कल्याण विभागाचे जात पडताळणी कार्यालय तालुकास्तरावर बारामती येथे सुरु करावे, तसेच महाराष्ट्र सरकारच्या वतीने मुलींसाठी जो व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी संपूर्ण फी माफीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे त्याची तंतोतंत अंमलबजावणी व्हावी व त्याचा लाभ प्रत्येक लाभार्थी मुलींना मिळवून द्यावा तसेच बारामती तहसील कार्यालयामार्फत शिक्षणासाठी लागणारे विविध दाखले विदर्थ्यांना लवकरात लवकर मिळवून द्यावे असे निवेदन आखिल भारतीय मराठा महासंघ बारामती यांच्यावतीने तहसीलदार यांना देण्यात आले.