बारामतीत घडली मानवतेला काळिमा फासनारी घटना, …. महिला सुरक्षा ऐरणीवर ?

बारामती : बारामती शहरानजीकच्या वंजारवाडीत एका विवाहित महिलेच्या गळ्याला चाकू लावत लुटून तिचे अर्धनग्न फोटो काढल्याचा प्रकार घडला असुन या घटनेमुळे बारामतीत पुन्हा मानवतेला काळीमा फासणारी घटना घडल्याने महिला असुरक्षित आहेत काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दाखल फिर्यादीनुसार २४ जुलै रोजी बुधवारी सायंकाळी वंजारवाडी येथे वास्तव्यास असलेली एक विवाहित महिला आपल्या आईकडे गेली होती. तेथून पुन्हा रुईच्या दिशेने वंजारवाडी येथील पालखी मार्ग चौकात पायी चालत असताना ही विवाहित महिला जवळच असलेल्या शेतात लघुशंकेसाठी गेली होती. त्यावेळी त्या ठिकाणी एकाने पाठीमागून येवून त्याच्याकडील चाकू दाखवत विवाहितेच्या गळ्याला लावत आणि तिच्याकडील १ तोळा वजनाचचे मनी मंगळसूत्र, ३.५ ग्रॅम वजनाची अंगठी, ४ ग्रॅम वजनाचे झुमके असे अंदाजे १ लाख ५ हजार रुपये किमतीचे दागिने हिसकावून घेतले. त्याचवेळी लागलाग आणखी दोन अज्ञात इसम त्या ठिकाणी आले. एकाने या विवाहितेचं तोंड दाबून मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर या विवाहित महिलेला कपडे काढण्यास सांगितले. मात्र त्यास महिलेने नकार दिल्यानंतर या तिघांनी तिच्या अंगावरील ओढणी फेकून देत टॉप फाडून फाडला. बाकीचे कपडे उतरवण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांनी या विवाहित महिलेचे अर्धनग्न फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढले. महिलेच्या मोबाईलमुळे काही अडचणी येतील या भीतीने विवाहित महिलेचा मोबाईल त्याच ठिकाणी या टाकून तिघांनी घटनास्थळापासून पळ काढला. संबंधित विवाहित महिलेने घडलेल्या घटनेप्रकरणी तालुका पोलीस स्टेशन बारामती येथे तक्रार तीन अज्ञात इसमा विरोधात दिली आहे.