विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिरच्या आदिती शेरकरला सुवर्णपदक

बारामती : सीआयएससीई दिल्ली बोर्ड व एन. एल. दालमिया हायस्कूल, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच राज्यस्तरीय कराटे स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये १४, १७ व १९ वर्षाखालील गटात २१० मुले व मुलींनी सहभाग घेतला होता.
सदर स्पर्धेमध्ये विद्या प्रतिष्ठानचे विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिर,
बारामतीच्या १७ वर्षाखालील मुलींच्या वयोगटात आदिती शेरकर हिने सुवर्ण पदक
मिळवले व झांसी, उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेकरिता तिची निवड झाली आहे आहे.. तिला कराटे कोच मिनानाथ भोकरे व क्रीडा शिक्षक जितेंद्र पटेल, नितीन जगताप व ऐनताज शेख यांनी मार्गदर्शन केले.
विद्या प्रतिष्ठान संस्थेचे विश्वस्त खा. सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष अॅड. अशोक
प्रभुणे, सचिव अॅड. नीलिमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, विश्वस्त डॉ. राजीव शहा, किरण गुजर, मंदार सिकची, शाळेचे प्राचार्य आशिष घोष व उपप्राचार्या रुपाली जाधव तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्गातर्फे खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.