October 24, 2025

सात भामट्यांनी वयोवृद्ध महिलेला 14 लाख 60 हजारांना फसविले.

3v12nfpa

बारामती : घरबसल्या पैसे कमवा या फसव्या जाहिरातीच्या आमिषाला बळी पडल्याची मोठी किंमत बारामतीच्या एका वयोवृद्ध महिलेला मोजावी लागल्याची घटना बारामतीत घडली आहे. वृत्तपत्रातील जाहिरातीच्या अनुषंगाने त्या महिलेची 14 लाख 60 हजार 760 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघड झाली आहे.

या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात शोभा रमेश खलाटे या वयोवृद्ध महिलेने पोलिसात फिर्याद दिली आहे या प्रकरणी, संजय शर्मा, राजीव कुमार, जयराम, अत्तार संग, अजय वीर सिंग, रघुनाथ उर्फ रघुभाई, विष्णू पटेल या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार दि. 3 मार्च ते 22 जुलै 2024 या कालावधीत घडला असून 3 मार्च 2024 रोजी लोकमत वृत्तपत्रात खोट्या जाहिरातीच्या अमिषाला बळी पडून खलाटे यांनी वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे भरण्यास सांगितले त्यानंतर फिर्यादीने पैसे आरटीजीएस द्वारे 14 लाख 60 हजार 760 रुपये वेगवेगळ्या खात्यांवर जाम केले मात्र त्यानंतर फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्या नंतर त्यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

You may have missed

error: Content is protected !!